Rahul Kanal : ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आले, IT ने मारलेली धाड; कोण आहेत राहुल कनाल?
Rahul Kanal: कुणाल कामराच्या व्हिडीओमुळे संतापलेले शिवसैनिकांनी मुंबईतील खार भागात असलेल्या 'द हॅबिटॅट' स्टुडिओची तोडफोड केली होती. खार पोलिसांनी तोडफोड प्रकरणात एकूण 19 जणांना ताब्यात घेतलं होतं. यात राहुल कनाल यांचं नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुणालच्या निषेधात सेटची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा
कोण आहेत शिवसेना नेते राहुल कनाल?
कोणत्या प्रकरणात आयकर विभागाने टाकला होता छापा
Rahul Kanal Profile : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या व्यंगात्मक टीकेमुळे सध्या शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थक संतापलेले आहेत. काल काही शिवसैनिकांनी थेट जिथे कुणाल कामराचा तो व्हिडीओ शूट झाला होता, तिथे जाऊन तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांनी ताब्यात घेतलं. यामध्ये एका नेत्याचं नाव होतं, ते म्हणजे राहुल कनाल.
मुंबईतील खार भागात असलेल्या 'द हॅबिटॅट' स्टुडिओची शिवसैनिकांनी काल तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कानल यांनाही ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे सध्या राहुल कनाल चर्चेत आहेत.
ठाकरेंकडून शिंदेंकडे...
एकनाथ शिंदे यांच्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे राहुल कनाल हे कधीकाळी ठाकरे कुटुंबाचे नीकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, जुलै 2023 मध्ये त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राहुल कनाल यांना त्यांच्या सोशल मीडिया मोहिमेचे राज्य प्रमुख म्हणून नियुक्त केलं होतं.
हे ही वाचा >> Kunal Kamra : एकनाथ शिंदेंनंतर कुणाल कामराचा मोदींवरही नाव न घेता निशाणा? नेमकं काय म्हणाला, वाचा...
राहुल कनाल हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचे आदित्य ठाकरे यांच्याशी वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधही होते. शिवसेनेच्या युवा सेनेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. जवळपास 10 वर्ष ते ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत होते. मात्र, नंतर काही लोकांशी मतभेद असल्याच्या कारणावरुन ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले.










