Raj Thackeray : "शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये", ठाकरेंचा टोला
Raj Thackeray on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या महाराष्ट्रात मणिपूर होण्याची चिंता वाटते, या विधानावर बोलताना राज ठाकरे यांनी चिमटा काढला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवारांच्या विधानावर राज ठाकरेचे उत्तर

महाराष्ट्र-मणिपूरबद्दल पवार काय बोलले?

राज ठाकरेंनी पवारांना काय केली विनंती?
Raj Thackeray Pune : (ओमकार वाबळे, पुणे) शरद पवारांनी केलेल्या एका विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून शरद पवारांना टोला लगावला. (Raj Thackeray's first reaction to Sharad Pawar's statement)
पावसामुळे पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी घरांमध्ये गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले.
मराठा विरुद्ध ओबीसी वाद वाढला
राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शरद पवारांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं. विशेष करून मराठवाड्यात जो मराठा विरुद्ध ओबीसी जातीयवाद वाढलाय... त्यांचे हे भाष्य आणि तुम्ही शरद पवारांच्या एकूण राजकारणावर जे भाष्य केले आहे. आता विधानाकडे कसे बघता?
राज ठाकरेंनी काय दिले उत्तर?
"शरद पवारांचं विधान मी वाचलेलं नाही. पण, शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये. बाकी काही नाही" असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.