Raj Thackeray : ''माझ्या नादी लागू नका, नाहीतर...'', ठाकरे, पवारांना राज ठाकरेंचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray big allegation on sharad pawar and udhhav thackeray manoj jarange patil maratha reservation  maharashtra poli
माझ्या दौऱ्याशी जरांगे पाटलांचा काहीएक संबंध नव्हता
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझ्या दौऱ्याशी जरांगे पाटलांचा काहीएक संबंध नव्हता.

point

जरांगेच्या आंदोलनामागून ठाकरे, पवारांचा राजकारण

point

कालच्या आंदोलनात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता.

Raj Thackeray News : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : ''माझ्या दौऱ्याशी जरांगे पाटलांचा काही एक संबंध नव्हता. मात्र त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजकारण करतायत'', असा गंभीर आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पवार, ठाकरेंना लक्ष्य केले आहे. (raj thackeray big allegation on sharad pawar and udhhav thackeray manoj jarange patil maratha reservation  maharashtra politics)

ADVERTISEMENT

''लोकसभेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात मतदान झालं होतं. हे मतदान शरद पवार आणि उध्दव ठाकरे त्यांच्या प्रेमाखातर 
झालं नव्हतं हे त्यांनी समजून घ्यावे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. तसेच शुक्रवारी झालेल्या बीडच्या आंदोलनावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कालच्या आंदोलनात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता. त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशीब पोलीसमध्ये पडले. पण नंतर तो ओरडत गेला ''एक मराठा लाख मराठा'' याचा अर्थ यांना दाखवायचंय हे आंदोलन जरांगे पाटलांचं आहे. पण जरांगेंच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरु आहे'', असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी ठाकरेंवर केला. 

हे ही वाचा :  Brazil plane crash video : गिरक्या घेत कोसळले विमान अन् 62 जणांचा गेला जीव; व्हिडीओ व्हायरल

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''शरद पवारांसारखा 82, 83 वर्षाचा माणूस विधान करतो की महाराष्ट्राचं मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याची चिंता केली पाहिजे. पण ते म्हणतायत मणिपूर होईल, म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे, हे तुम्हाला कळेल. पुढच्या तीन, साडेतीन महिन्यात यांना जेवढ्या काही दंगली घडवता येतील, खासकरून मराठवाड्यात यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे'', असा आरोप राज ठाकरेंनी पवार, ठाकरेंवर केला. 

हे वाचलं का?

''शरद पवारांचं जर राजकारण बघितलं तर दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी राष्ट्रवादी सूरू केल्यानंतर सूरू झालं, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. माझ्या दौऱ्यात यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, उद्या माझं वादळ उठलं तर यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. माझ्या नादी लागू नका'', असा इशारा देखील राज ठाकरेंनी पवार, ठाकरेंना दिला आहे. 

''मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा मुंबईत निघाला  होता. ज्या ठिकाणी मोर्चा अडवला तिकडे व्यासपीठावर भाजपची, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेची लोकं होती. सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही एकमूखाने मागणी केली होती. जर तुमच्या सगळ्यांचं एकमत आहे, तर तुम्हाला अडवलं कुणी?'' असा सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Sanjay Raut : "सुपाऱ्या फेकणारे 100 टक्के शिवसैनिक असतील, पण...", राऊतांचा खुलासा

''गेली 10 वर्ष मोदी केंद्रात पंतप्रधान आहेत, आता तिसरी टर्म सूरू आहे. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीत येऊन सांगितलं होतं मी शरद पवारांचा बोट पकडून राजकारणात आलो. मग त्या पवारांनी मोदींपुढे मराठा आरक्षणाचा शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात नांदत होते ना, मग मराठा आरक्षणासाठी यांनी शब्द का नाही टाकला? आता जरांगेच्या मागून यांचं मतं मिळवण्यासाठी राजकारण सुरू आहे. पण तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभो, माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ना कळणार पण नाही.नंतर घरी आल्यावर आरशात पाठ आणि पोट बघावं लागेल आणि गाल पण बघावे लागतील'', असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 

ADVERTISEMENT

राज ठाकरे पुढे म्हणाले,  त्यादिवशी मोबाईलवरती क्लिप पाहिली. लहान लहान मुली बोलत होत्या आम्ही ओबीसी समाजातल्या आणि मैत्रिणी मराठा समाजातल्या, पण या सगळ्या वातावरणामुळे त्या सगळ्या दुर झाल्या. इतक्या खालच्या पातळीवर आणलंत राजकारण, का तुम्हाला सत्तेत यायचं म्हणून,राजकारण करायचं म्हणून...असं जातीच राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये, द्वेष पसरता कामा नये, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा, ओबीसी आणि इतर समाजांना ही विंनती आहे, यांच्या नादी लागू नका.निवडणुका येतील निवडणुका जातील पण ही जखम बरी होणार नाही. हे सतत त्याच्यावर मीठ टाकत राहतील, असा हल्ला देखील राज ठाकरेंनी पवार, ठाकरेंवर चढवला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT