MNS : राज ठाकरे CM शिंदेंवर भडकले; म्हणाले, “नुसतं बोलायचं बाळासाहेबांचे विचार,पण…”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

raj thackeray criticize cm eknath shinde marathi singboard supreme court mns pune tour
raj thackeray criticize cm eknath shinde marathi singboard supreme court mns pune tour
social share
google news

MNS Raj Thackeray Criticize CM  Eknath Shinde : मुंबईतील दुकाने आणि आस्थापणे यांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली मुदत सोमवारी 27 नोव्हेंबरला संपली. या मुदतीनंतरही 20 टक्केच दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याचे समोर आले आहे. याच मराठी पाट्यांसाठी नेहमीच आक्रमक राहिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या मुद्यावर प्रतिक्रिया आली आहे. या प्रतिक्रियेत राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. नुसतं बोलायचं बाळासाहेबांची विचार पण अंमलात काहीच आणायच नाही. शासनाच्या धाक नावाची काही गोष्ट उरली की नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. (raj thackeray criticize cm eknath shinde marathi sign board supreme court mns pune tour)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील सुतारवाडीतील मनसे कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनापुर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांना मराठी पाट्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारला. यावर राज ठाकरे यांनी आपले सरकार नुसते मराठी आणि हिंदुत्वाबद्दल तोंड वाजवायला असल्याची टीका केली.

हे ही वाचा : Crime : प्रियकराचा मुलीवर बलात्कार अन् आईला तुरूंगवासाची शिक्षा, प्रकरण काय?

हे म्हणतात बाळासाहेबांचे विचार…कुठल्या बाळासाहेबांचे विचार यांनी घेतले, नुसतं आपलं बोलायचं बाळासाहेबांची विचार आणि अंमलात काहीच आणायचं नाही,अशी टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसेच कोर्टाने सांगून सुद्धा यांना मराठी पाट्या करता आल्या नाहीत. जेव्हा आम्ही मराठी पाट्या केल्या होत्या, त्यावेळी सरसकट मराठी पाट्या लागल्या. तसेच मी मशिदीवरचे भोंगेही काढायच म्हटलं, तेही भोंगे काढता आले नाही. शासनाच्या धाक नावाची काही गोष्टी उरली की नाही? कोर्टाची भीती वाटते की नाही? असे संतप्त सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारले. तसेच उद्या जर कोर्टाची भिती नाही, शासनाची भिती नाही, मग आपण अराजकाकडे जाऊ, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?

पत्रकारांनी यावेळी राज ठाकरेंना पुण्यात ड्रग्जचे रॅकेट असल्याची माहिती दिली. यावर राज ठाकरे म्हणाले, ते पु्ण्यात कशाला घेताय, देशभर हेच पसरले आहे. पण माझा महाराष्ट्र पोलिसांवर इतका विश्वास आहे की यांनी 24 तासाची मोकळीक द्यावी, सगळ वठणीवर आणून ठेवतील. पण यांना आणायचंच नाही. आता ड्रग्जचाच पैसाच सगळीकडे वापरला जातोय,अशी शंका येतेय, असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT