राजू पाटलांनी घेतली छत्रपती संभाजीराजेंची भेट; राज ठाकरेंनी काय मेसेज पाठवला?
-मिथिलेश गुप्ता राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, सहाव्या जागेवरून बरंच खलबतं सुरू आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास शिवसेनेनं नकार दिल्यानंतर मनसेने पाठिंबा जाहीर केलाय. याचसंदर्भात आज मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माहिती दिली. संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. मनसेचे […]
ADVERTISEMENT

-मिथिलेश गुप्ता
राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, सहाव्या जागेवरून बरंच खलबतं सुरू आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास शिवसेनेनं नकार दिल्यानंतर मनसेने पाठिंबा जाहीर केलाय. याचसंदर्भात आज मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माहिती दिली.
संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली आणि मनसेचा पाठिंबा जाहीर केला. दोन दिवसांपूर्वीही मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केलं होतं.
काय म्हणाले आमदार राजू पाटील?