छगन भुजबळ शरद पवारांना तुरुंगातून करायचे ब्लॅकमेल; रमेश कदमांनी टाकला ‘बॉम्ब’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Former mla ramesh kadam big statement. kadam says chhagan bhujbal blackmailed ncp supremo pawar.
Former mla ramesh kadam big statement. kadam says chhagan bhujbal blackmailed ncp supremo pawar.
social share
google news

Ramesh Kadam On Chhagan Bhujbal and Sharad Pawar : अजित पवारांच्या गटात जाऊन कॅबिनेट मंत्री झालेल्या छगन भुजबळांबद्दल माजी आमदार रमेश कदम यांनी नवा राजकीय बॉम्ब टाकला. छगन भुजबळ जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा ते शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे आणि आम्ही ते पाहिलं आहे”, असा मोठा दावा रमेश कदमांनी केला आहे. (former MLA Ramesh kadam big statement, he claim that, chhagan bhujbal was blackmailed to sharad pawar when he was in the jail.)

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माजी आमदार रमेश कदम राजकारणात सक्रिय झाले आहेत. पंढरपूर येथे रमेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि मी काही एकत्रच तुरुंगात होतो, अशी माहिती दिली.

हेही वाचा >> मुंबई Tak चावडी: ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातली मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

‘तुरुंगातील छगन भुजबळ आणि आताच भुजबळ यात काय फरक आहे?’, असा प्रश्न रमेश कदम यांना विचारण्यात आला. त्यावर माजी आमदार कदम म्हणाले, “तुरुंगातील छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे. काकुळतीला यायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज पडायची. आताचे भुजबळ खूपच फीट आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ramesh Kadam : “भुजबळांनी आजारी दाखवून सहानुभूती मिळवली”

माजी आमदार रमेश कदम पुढे बोलताना म्हणाले, “आता आम्ही कधी अशी बातमी ऐकली नाही की, त्यांच्या छातीत दुखतंय. त्यांचा पाय सुजलाय. त्यांना खांद्याचा त्रास झालाय किंवा आणखी काही त्रास झालाय. तुरुंग कुणाच्या नशिबात येऊ नये. तो नरक आहे. पण, त्याठिकाणी गेल्यानंतरच्या क्लुप्त्या लोकांना माहिती आहे. तिथे गेल्यानंतर आठ दिवसात लोक आजारी पडतात. बरंच काही होतं. ते कारण दाखवून ते लोकांची, नेत्यांची, पक्षाची सहानुभूती मिळवायची आणि बाहेर यायचे, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळी ते केलं.”

भुजबळांनी पवारांना कसं केलं ब्लॅकमेल, कदमांनी सांगितलं किस्सा?

“त्यावेळी ते शरद पवारांनी मदत केली पाहिजे. मला उशीर होतोय, याबद्दलची नाराजी ते (छगन भुजबळ) बोलून दाखवायचे. जर माझा लवकर जामीन झाला नाही, तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल किंवा काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग करताना त्यांना (छगन भुजबळ) आम्ही पाहिलं आहे”, असा दावा रमेश कदम यांनी छगन भुजबळांबद्दल केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Kala Pani Jail : अंगावर येतो काटा… सावरकरांना ठेवलेल्या काळा पाणी तुरुंगाचा इतिहास काय?

छगन भुजबळ अजित पवारांच्या गटात

जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांसह पक्षातील काही आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांचा ज्या दिवशी शपथ विधी होणार होता, त्या दिवशी भुजबळांनी पवारांना कॉल केला. बघून येतो, असं सांगून ते गेले आणि अजित पवार गटात सामील झाले. शरद पवारांनीच ही गोष्ट नंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT