काँग्रेसचं टेन्शन वाढलं! निवडणुकीपूर्वीच गेहलोत-पायलट संघर्ष पुन्हा उफाळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Clash again between Chief Minister Ashok Gehlot and former Deputy Chief Minister Sachin Pilot
Clash again between Chief Minister Ashok Gehlot and former Deputy Chief Minister Sachin Pilot
social share
google news

Sachin Pilot in Rajasthan :

राजस्थानमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये पुन्हा ‘शीतयुद्ध’ सुरू झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) हे दोन बडे नेते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी संगनमत केल्याचा अन् भाजप नेत्यांना वाचवलं जात असल्याचा आरोप पायलट यांनी केला आहे. (Clash again between Chief Minister Ashok Gehlot and former Deputy Chief Minister Sachin Pilot)

सचिन पायलट म्हणाले की, अशोक गेहलोत यांनी वसुंधरा राजे यांच्या काळात झालेले सर्व घोटाळे दडपले आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर आम्ही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे वचन दिले होते. पण संगनमतामुळे या सगळ्या गोष्टी दबून गेल्या. आमचं सरकार स्थापन झाल्यानंतरही आम्ही भ्रष्टाचार प्रकरणांबाबत अनेक दावे केले होते, आजतागायत हे काम झाले नाही. त्यामुळे या गोष्टी समोर येण्यासाठी आणि सरकारकडून न झालेली काम होण्यासाठी मी 11 एप्रिलला हुतात्मा स्मारकावर एकदिवसीय उपोषण करणार असल्याचे घोषणा यावेळी पायलट यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विरोधकांच्या एकजुटीच्या ठिकऱ्या? ‘हे’ प्रश्न होताहेत उपस्थित; G 8 चं काय?

सचिन पायलट म्हणाले, मी 28 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले होते, परंतु कोणतही उत्तर आलं नाही. पुन्हा 2 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र लिहून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाईची मागणी केली, यात मग ते खाण माफियांचे प्रकरण असो की इतर कोणतेही. यावेळी गेहलोत यांनी वसुंधरा यांच्यावर आरोप केलेला एक व्हिडीओही सचिन पायलट यांनी दाखवला. विरोधी पक्षात असताना आम्ही लढलो होतो. त्यामुळे आम्ही सत्तेत आलो. विरोधात असताना आम्ही वसुंधरा राजे सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे मांडले. विरोधी पक्षात असताना केलेल्या आरोपांवर कारवाई केल्यावर आमची विश्वासार्हता ठरेल, असंही गेहलोत म्हणाले. यापूर्वीही पेपर फुटीचे प्रकरण किंवा शहिदांच्या अपमानाच्या मुद्द्यावरुन पायलट यांनी आपल्याच सरकारवर निशाणा साधला होता.

हत्तींना ऊस खाऊ घातलं, वाघांचे फोटो काढले; PM मोदींचा हटके अंदाज

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या दरवर्षी एकाच पक्षात येतात. पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे पण गेहलोत त्यांना संधी देत ​​नसल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात गेहलोत गट आणि पायलट गट असे एकाच पक्षात 2 गट काम करत असल्याचा वारंवार दिसून आलं आहे. गेल्या वर्षी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तेव्हा अशोक गेहलोत यांचे नाव या पदासाठी आघाडीवर होते. पण गेहलोत पक्षाध्यक्ष झाल्यास राजस्थानची कमान सचिन पायलट यांच्याकडे दिली जाऊ शकते, असे लक्षात येताच गेहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री राहण्यास पसंती दर्शविली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT