कोण आहेत भाजपचे खासदार प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासवर सागर लोकसभेत घुसला

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Parliament Winter Session 2023 : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणांची नावं आता समोर आली आहेत. त्या दोघांची नावं सागर आणि मनोरंजन (Sagar And manoranjan) असल्याचे पोलिसांनी सांगितले. सभागृहाच्या कामकाजात सहभागी असलेले खासदार दानिश अली यांनी सांगितले की, सभागृहात उड्या मारणारे तरुण भाजप खासदाराच्या (BJP MP) नावाने लोकसभा अभ्यागत पास (Loksabha pass) घेऊन कामकाज पाहण्यासाठी आले होते. सभागृहात गोंधळ घालण्यासाठी आलेल्या तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर संसदेबाहेर गोंधळ घालणाऱ्या एका युवकाला आणि महिलेलाही अटक करण्यात आली आहे.

सिम्हा यांच्या नावाने पास

बसपामधून निलंबित करण्यात आलेल्या खासदार दानिश अली यांनी सांगितले की, सभागृहात उडी मारून दहशत पसरवणाऱ्या युवकाने कर्नाटकातील म्हैसूरमधील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने अभ्यागत पास आणले होते. भाजपच्या तिकीटावर सिम्हा हे कर्नाटकातील म्हैसूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

प्रेक्षक गॅलरीतून उडी

आता खासदार प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन त्या पासबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. खासदार सिम्हा यांच्या पासवरच सागर आणि मनोरंजन हे दोघं जण लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि बुटामध्ये कलर स्मोकचा वापर करून गोंधळ माजवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> संसदेबाहेरच्या ‘त्या’ गोंधळाचं आहे थेट महाराष्ट्र कनेक्शन? सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू

‘सिम्हा’ नेहमीच वादग्रस्त

पत्रकार असलेले नंतर राजकारणात प्रवेश केले प्रताप सिम्हा यापूर्वीही अनेकदा वादात सापडले आहेत. गेल्या वर्षी प्रताप सिम्हा यांनी म्हैसूर-उटी रस्त्यावरील बसस्थानक पाडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी त्यांनी इशारा दिला होता की, सोशल मीडियावर जो मी बस स्टॉप पाहिला होता. तो अगदी घुमटासारखा होता, त्याच्या मध्यभागीही आणि दुसऱ्या बाजूलाही एक घुमट होता. त्यामुळे बसस्टॉप हा एक प्रकारचा मशीदच होता. त्यामुळे त्यावेळी संबंधित अभियंत्याना मी हे बांधकाम पाडणार असल्याचे सांगितले होते.

व्हिजिटर पास

संसद मार्ग पोलिसांनी या घटनेनंतर एका युवकाला आणि एका महिलेला संसद भवनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या ताब्यात घेतले आहे. तर त्याचवेळी लोकसभेत सुरू असलेल्या शून्य प्रहाराच्या कामकाजावेळीच दोन युवकांनी गोंधळ घातला होता. हे दोघंही तरुण प्रथम प्रेक्षक गॅलरीमध्ये व्हिजिटर पास घेऊन पोहोचले होते, नंतर त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या टेबलवर उडी मारली होती.

ADVERTISEMENT

लोकसभेत पिवळा धूर

या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी बुटामध्ये लपवलेला कलर स्मोक फोडल्यामुळे लोकसभेत सगळीकडे पिवळा धूर पसरला होता. त्या धुराचा त्रासही लोकसभेतील खासदारांना झाला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नीलम (वय 42) आणि अमोल शिंदे (वय 25) या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्या दोघांची चौकशी सुरु करण्यात आली असून परिवहन भवन परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

आठवण 22 वर्षापूर्वीची

ही घटना घडल्यानंतर 2001 मधील घटनेची आठवण अनेकांनी सांगितली. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी 2001 मध्ये याच दिवशी संसदेवर हल्ला केला होता, त्यामध्ये 9 जण ठार झाले होते.

हे ही वाचा >> Parliament Security Breach : ‘ते’ तरुण नेमके लोकसभेत शिरले तरी कसे?, ‘ती’ घटना जशीच्या तशी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT