Shiv sena : राऊतांचा भाजपसह शिंदे गटावर गंभीर आरोप, ‘खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी…’

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

sanjay raut big allegation on cm eknath shinde shiv sena group and bjp khichadi scam bmc
sanjay raut big allegation on cm eknath shinde shiv sena group and bjp khichadi scam bmc
social share
google news

Sanjay raut big allegation on cm eknath shinde and  Bjp : खिचडी घोटाळ्यात नुकतीच ठाकरे गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांना अटक करून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खिचडी घोटाळ्याचे (Khichadi scam)  सगळे लाभार्थी भाजप आणि मिंधे गटात असल्याचा आरोप केला आहे. राऊतांनी यावेळी त्या व्यक्तींची नावे देखील सांगत, बीएमसीकडून पैसै घेऊन खिचडीचे वाटप केली नसल्याचा आरोप केला. (sanjay raut big allegation on cm eknath shinde shiv sena group and bjp khichadi scam bmc)

संजय राऊत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी खिचडी घोटाळ्यावरून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. खिचडी घोटाळ्यात सगळे लाभार्थी भाजप आणि मिंधे गटातील असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यातल्या काही लोकांच वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावर केटरींगचा व्यवसाय आहे. या लोकांनी 20-25 कोटीची खोटी बिले काढत बीएमसीकडून पैसै घेऊन देखील खिचडीचे वाटप केला नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation: भुजबळांचा CM शिंदेंना टोला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेवरून काय म्हणाले?

दरम्यान मुलुंडचा एक मिंधे गटाचा कार्यकर्ता आहे. त्याला हात लावत नाही. सूरज चव्हाणचा त्या व्यवसायातला पार्टनर त्याला हात लावत नाहीत. अमेल घोले, वैभव थोरात, राहुल कनाल अशी त्यांचीन नावे देखील राऊतांनी सांगितले. कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार यांनी महापालिकेत केला आहे. मुलुंडच्या पोपटलालमध्ये या लोकांची नावे घेण्याची हिम्मत आहे का? असा सवाल राऊतांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुरज चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना, मग 120 कोटी लोकांनी खिचडी वाटप केली आहे. किती लोकांना तुम्ही चौकशीला बोलावलेत. त्यांचा पार्टनर मिंधे गटाचा खासदार आहे, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. तुम्ही आमच्यावर वार करा, आम्ही वार झेलायला तयार आहोत. पण इतकं लक्षात असू द्या पलटवाराची संधी आम्हालाही मिळणार आहे. आमच्या वार केल्यानंतर तुम्ही उठणार नाही आहात, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निवडीवर ठाकरे कडाडले, ‘लोकशाही संपवण्याच्या दिशेने…’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT