‘फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश’, संजय राऊतांनी मोदी-शाहांवर डागली तोफ

मुंबई तक

आमच्या हातात सरकार द्या, 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील, असे मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आता फडणवीसांना शिवसेनेत घ्यायचे की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

sanjay raut criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli
sanjay raut criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli
social share
google news

आमच्या हातात सरकार द्या, 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील, असे मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. आम्ही सामनामध्ये बातमी वाचू, ईडीच्या भयाने फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश, आता फडणवीसांना शिवसेनेत घ्यायचे की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (sanjay raut criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli)

वरळीत उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचं राज्यव्यापी शिबीर पार पडतंय. या शिबिरात संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. पाकिस्तान 3A चालवतात, अल्लाह, आर्मी आणि अमेरीका, आणि आपला देश सुद्धा तीन लोक चालवतात, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स. मोदी बिदी सगळं झुट आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच उद्या आमच्या हातात सरकार द्या, 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील. आम्ही सामनामध्ये बातमी वाचणार ईडीच्या भयाने फडणवीसांचा शिवसेना प्रवेश, आता घ्यायेच की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुढे शिंदे गटावरही टीका केली. त्यांच्या शिवसेनेचा 69 वा वर्धापण दिन, म्हणजे शिवसेनेच्या जन्माआधी यांची शिवसेना, तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहित नाही, आणि शिवसेनेवर दावा सांगायला निघाला आहात,अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच निवडणूक आय़ोगाला खोके देऊन तारीख घेतली काय? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं

 संजय राऊतांनी ऐकवली कविता

संजय राऊत यांनी यावेळी एक कविता देखील ऐकवली. ”दो मस्ताने चले जिदंगी बनाने”, ”चुना लगाने पुरे देश डूबाने”, अशा कवितेच्या ओळी सांगुन त्यांनी याचा अर्थ सांगितला. हे दोन मस्ताने दिल्लीत आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील आहेत. हे दो मस्ताने महाराष्ट्र लुटतायत, डूबवतायत अशी टीका राऊत यांनी केली. यासोबतच नाशिक, बंगळूरू आणि देवास ही सरकारची नोटा छापण्याची कारखाने आहेत. या कारखान्यातील 88 हजार करोड रूपयाच्या नोटा बेपत्ता झाल्या आहेत. या छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले आहेत. हे ट्रक गेलेत कुठे? महाराष्ट्रात जो खेळ झाला, त्यासाठी तर हे पैसै वापरले नाही, असा संशय देखील राऊत यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp