Shivsena : ‘काल जे घडलं तो ट्रेलर, 2024 ला….’ संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Balasaheb memorial thackeray and shinde group riot : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मृतीदिनाच्या पुर्वसंध्येला शिवाजी पार्कवरील दोन्ही गटांमध्ये गुरूवारी राडा झाला. या राड्या दरम्यान दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर गेले, विरोधात घोषणाबाजी केल्या आहे. या सर्व शिवाजी पार्कवरील राड्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्मृतीस्थळावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल?अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली आहे. (sanjay raut reaction on balasaheb memorial thackeray group and shinde group riot dadar shivaji park maharashtra politics)

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, बाळासाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिली, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, ते शिवसैनिक कसले? असा खऱमरीत सवाल राऊत यांनी शिंदे गटाला विचारला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचेच आहेत. स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं, पण काल स्मृतीस्थळावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नौटंकी केली तत्यांना आम्ही कधीच शिवसैनिक म्हणणार नाही. त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी अजिबात श्रद्धा नाही, असी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली.

हे ही वाचा : Crime : गर्लफ्रेंडला निर्जनस्थळी बोलावलं अन् गळा चिरला, बॉयफ्रेंडने हत्या का केली?

संत तुकडोजी महाराजांच एक अभंग आहे. ‘मनी नाही भाव, देवा मला पाव’, ‘देव बाजारचा भाजी पाला नाही’. तुमच्या मनात श्रद्धा नाही, भाव नाही आणि तुम्ही स्मृती स्थळावर येऊन नौटंकी करता, असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला. तसेच तुमच्या मनामध्ये बाळासाहेबांबद्दल भाव नाही आणि स्मृतिस्थळावर येऊन नौटंकी करता, अशीही टीका राऊतांनी यावेळी केली. कुणी काहीही म्हणू दे, काल जो प्रकार घडला निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला, हा कालचा ट्रेलर आहे आणि 2024 ची तयारी देखील आहे, असा इशाराच राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काल तिथे आलेल्यांनी आधीच 10 वेळा पक्ष सोडलाय. ते आम्हाला काय निष्ठा शिकवतायत? कुणी काँग्रेसमध्ये गेले. कुणी राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना शिंदे गटात गेले, असेही राऊतांनी सांगितले.विभीषण आपल्या स्वार्थासाठी जेव्हा आला होता तेव्हा प्रभुरामाने त्याचा वापर केला आणि नंतर त्यांना सोडून दिले त्यांना काय माहित राम काय आहे. या लोकांना अयोध्या आम्ही पहिल्यांदा दाखविली. उद्धवजी यांच्या नेतृत्वात ते आयोध्येत गेले आता मुख्यमंत्रीपदावर जेव्हापासून बसले होते तोपर्यंत बीजेपीचे पोपट म्हणून बोलत राहतील, अशी टीकाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.

हे ही वाचा : ठाकरेंच्या ‘त्या’ दोन नेत्यांनी…, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT