Sharad Pawar: ‘…ते सगळं दुखणं दूर करणार’, पवारांनी पुन्हा ठणकावून सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar criticism of the opposition he assured the workers that he will remove all the pain
Sharad Pawar criticism of the opposition he assured the workers that he will remove all the pain
social share
google news

…ते सगळं दुखणं दूर करणार, पवारांनी पुन्हा ठणकावून सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केळगावमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण अजून म्हातारे झालो नाही असं सांगत लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद अजून माझ्यामध्ये असल्याचे सांगत तुम्ही काहीही चिंता करू नका असा विश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ते सगळं दुखणं दूर

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती स्पर्धेनिमित्त त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देत कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी तक्रारही बोलून दाखवली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही नेहमी माझ्या वयाचा दाखला देत मी 84 वर्षांचा झालो, 83 वर्षांचा झालो असं सांगत मात्र अजून मी म्हातारा झालो नाही असं सांगत तुमचं जे दुखणं आहे ते सगळं दुखणं दूर करण्यासाठी जे करायला लागणार आहे ते सगळं करणार आणि नवा इतिहास घडवणार असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> अश्वजीतची चौकशी नाही, कारही गायब…, प्रिया सिंहचे पोलिसांवरच गंभीर आरोप

अशा स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर गाजवा

शरद पवार यांनी आपल्या राजकीय फटकेबाजीत कार्यकर्त्यांना विश्वास देत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधल्याने शरद पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. यावेळी शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीविषयीही कौतुक करत अशा स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरही गाजल्या पाहिजेत असं मतही त्यांनी व्यक्त केले.

कार्यकर्त्यांना विश्वास

शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत आपल्या वयाचा दाखला दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आगामी काळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला असल्याचे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘OBC विरोधात बोलणाऱ्यांचा…’, छगन भुजबळांचा थेट इशारा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT