Sharad Pawar: "महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर..."; मविआच्या मेळाव्यात शरद पवारांचं सूचक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar
Sharad Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फक्त महाराष्ट्राचा विचार करण्याचे दिवस राहिले नाहीत - शरद पवार

point

शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

point

मविआच्या पदाधिकारी मेळाव्यात शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Speech : लोकशाहीच्या संस्थांवर आणि पद्धतीवर विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले आहेत. त्यामुळे आपण अतिशय जागरुक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक दोन महिन्यात आपण लावणार आहोत. या कमी दिवसात या तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी लोकांच्यात जाऊत त्यांच्यात परिवर्तनाचा विचार रुजवला पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ते महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात मुंबईत बोलत होते. 

ADVERTISEMENT

फक्त महाराष्ट्राचा विचार करण्याचे दिवस राहिले नाहीत - शरद पवार

कार्यकर्त्यांना संबोधीत करताना शरद पवार म्हणाले, काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची आपली दिशा काय राहणार आहे, महाराष्ट्रावर जे संकट आहे, त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल, यासाठी मविआचा आजचा मेळावा आहे. महाराष्ट्रात जर परिवर्तन करायचं आहे, त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे, हे आपल्या सर्वांना पाहावं लागेल. फक्त महाराष्ट्रापुरता विचार करण्याचे दिवस राहिले आहेत, असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा विचार करायला पाहिजे. पण अजूनही देशाचं संकट पूर्णपणे गेलं आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही.

हे ही वाचा >> Indian Hockey Team: "सरपंच साहेबांनी मोठं..."; श्रीजेशच्या निवृत्तीनंतर PM मोदी नेमकं काय म्हणाले?

शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी आपण संविधानासंदर्भातील भूमिका मांडली. मी जबाबदारीने सांगतो की या निवडणुकीत काही प्रमाणात यश आलं. याचा अर्थ असा नाही की, संविधानावर असलेलं संकट पूर्णपणे गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाहीत. आज देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत, त्यांना या सगळ्या संविधानात्मक संस्था, विचारधारा आणि तरतुदी यांच्याविषयी आस्था नाही. देशाचे प्रधानमंत्री संसदेची प्रतिष्ठा किती ठेवतात, हे व्यासपीठावर असलेले राज्यसभेचे सदस्य तुम्हाला सांगतील. राज्यसभेचं आणि लोकसभेचं अधिवेशन झालं. या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनात देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनात आले नाहीत. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा याकडे ढुंकूनही बघत नाहीत. अशी वृत्ती या राज्यकर्त्यांची आहे, असंही शरद पवार म्हणाले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sanjay Raut: महाराष्ट्राची लाडकी बहीण कोण? संजय राऊतांनी मविआच्या मेळाव्यात थेट नावच सांगितलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT