Baramati: शरद पवारांकडून अजितदादांना जेवणाचं निमंत्रण, पवार नव्या गुगली दादांची विकेट घेणार?
Sharad Pawar and Ajit Pawar: शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद फडणवीस यांना बारामतीतील आपल्या निवासस्थानी खास जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. पण यामागे पवारांची नेमकी राजकीय खेळी काय याविषयी आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवारांचा नवा डाव

मुख्यमंत्री बारामतीत येणारा

मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना जेवणाचं निमंत्रण
Sharad Pawar invited Ajit Pawar for lunch in Baramati: बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्या वेळी कोणता डाव टाकतील हे भल्याभल्यांना कळत नाही. आपल्या राजकीय शत्रूला नामोहरम करण्यात शरद पवार हे अगदीच पटाईत आहेत. पण त्यासाठी ते जे रणनिती आखतात ती अनेकदा पेचात टाकणारी असते. आता असाच एक डाव शरद पवारांनी टाकलाय.. तो म्हणजे खुद्द अजित पवार यांनाच जेवणाचं निमंत्रण देऊन... आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया. (sharad pawar invitation to cm eknath shinde dcm ajit pawar devendra fadnavis for lunch in baramati what exactly is a political strategy)
2 मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे हजर राहणार आहेत. पण हीच संधी साधून शरद पवारांनी एक नवी राजकीय खेळी खेळली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपल्या बारामतीमधील खासगी निवासस्थानी थेट जेवणाचं आमंत्रण दिलं आहे.
शरद पवारांची कृती ही कधीही साधी-सरळ नसते. ती असते कायमच बुद्धीबळातील उंटासारखी तिरकी... आणि आता देखील तशीच चाल शरद पवारांनी खेळली आहे.
हे ही वाचा >> NCP ची बँक खाती ताब्यात, मुख्यालयावरही अजितदादांचा दावा
सर्वात आधी शरद पवारांनी 2 मार्चचा शासकीय कार्यक्रमाला आपल्याला आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हजर राहायला आवडेल असं म्हणत थेट पत्रत मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच बारामतीला येत आहेत त्यामुळे त्यांनी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंतीही शरद पवारांनी यावेळी केली आहे. याबाबत एक पत्रच पवारांनी मुख्यमंत्र्यांना देऊ केलं आहे. वाचा त्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.