शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका तरी आम्ही शिवसेनेसोबत…,पटेलांनी सांगितल खळबळजनक कारण
बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी खालच्या भाषेत टीका केली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत सहभाग घेतला. प्रफुल्ल पटेल यांनी हा टोला खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
ADVERTISEMENT
india today conclave mumbai 2023: गेल्या दोन दिवसांपासून इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेव्हच्या निमित्ताने राजकीय चर्चांना उधान येत आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धक्कादायक विधानं करुन राजकीय वातावरण ढवळून काढले. त्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) अजित पवार गटाचे (DCM Ajit Pawar) नेते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (National Working President Praful Patel) यांनी आजच्या इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये धक्कादायक विधानं करुन त्यांनीही राजकीय चर्चांना उधान आणले.(Sharad Pawar is criticized in low language, we are with Shiv Sena Praful Patel tells exciting reason)
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळेंना उत्तर
शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच्या कार्यक्रमात अजित पवार गटाबरोबर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी करफ्ट पार्टी असल्याचे म्हटले होते. त्याची आठवण करुन देत त्यांच्याबरोबर गेलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या त्याच टीकेला उत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनीही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या खालच्या पातळीवर केलेली टीकेची आठवण करुन दिली.
हे ही वाचा >> Priyanka Chaturvedi: ‘एकाही नेत्यावर ईडीचे गुन्हे नाहीत’, शेवाळेंच्या दाव्यावर ठाकरेंच्या खासदाराने काढली यादी
ठाकरेंची टीका
प्रफुल्ल पटेल यांनी सुप्रिया सुळेंना त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत म्हणाले की, ज्या शरद पवारांना राज्यात आणि देशात आदर दिला जातो. त्या शरद पवारांवर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मात्र त्या टीकेकडे आम्ही दुर्लक्ष करुन त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
हे वाचलं का?
निर्णय निवडणूक आयोगाचा
प्रफुल्ल पटेल यांनी आज बोलताना राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर ठामपणे न बोलता त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष पुढं घेऊन जात असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शरद पवार यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची हे निवडणूक आयोगाकडून निर्णय आल्यानंतर त्याविषयी मी भाष्य करणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा >> दारुची पैज जीवावर बेतली!, 2 लाख कमवण्याच्या नादात धक्कादायक अंत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT