NCP : शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाची अखेरची खेळी
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून असलेल्या अधिकारांनाच अजित पवार गटाने सुनावणी दरम्यान आव्हान दिले आहे.
ADVERTISEMENT

NCP Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत. पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा मुद्दा अजित पवारांच्या वकिलांनी मांडला.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यच नाहीयेत, त्यामुळे ते पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात, या युक्तिवादानेच अजित पवार गटाने युक्तिवाद संपवला. पण, या मुद्द्याची चांगलीच चर्चा होत आहे.
आमदार अपात्रता प्रकरण : अजित पवार गटाचं म्हणणं काय?
अजित पवार गटाने शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्न उपस्थित केले. अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळा मुद्दा मांडला.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झाली नाही. शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली’, असे अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले.










