NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
sharad pawar ncp : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा

शरद पवारांच्या पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता

शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार
Sharad Pawar Ncp, Election Commision of India :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा दिलासा मिळाला आहे. (sharad pawar ncp big relief sharad pawar party and symbol tutari election commision of india)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणारे तुतारी चिन्ह आता यापूढेही कायम राहणार आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे.
हे ही वाचा : Worli Accident : मिहीरने BMW वांद्र्यात सोडली अन् रिक्षाने... वाचा Inside Story
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं, पण आम्हाला देणगी स्वरुपात रक्कम घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता तसेच कर लाभ देखील मिळत नव्हते. आता आमची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही निवडणूक आयोगाकडे दुसरी एक विनंती केली. यामध्ये तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये, असेही त्या म्हणाल्या आहेत.