Manoj jarange : 'शिंदे-फडवणवीसांचे आरोप पोरकट', जरांगेंवरील 'त्या' आरोपांवर शरद पवारांचे उत्तर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

मराठा आंदोलक मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट बोलत असल्याची टीका उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या टीकेचा समाचार आता शरद पवार (sharad pawar) यांनी घेतला आहे. '
sharad pawar reaction on manoj jarange sit inquiry devendra fadnavis eknath shinde rajesh tope maratha reservation
social share
google news

Sharad pawar reaction on manoj jarange sit inquiry : मराठा आंदोलक मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट बोलत असल्याची टीका उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या टीकेचा समाचार आता शरद पवार (sharad pawar) यांनी घेतला आहे. 'जबाबदार लोकं इतकं पोरकट बोलतात, हे महाराष्ट्रात मी कधी पाहिलं नाही, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांची वक्तव्य मी पाहिली'', अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis)  प्रत्युत्तर दिले आहे. (sharad pawar reaction on manoj jarange sit inquiry devendra fadnavis eknath shinde rajesh tope maratha reservation) 

ADVERTISEMENT

शरद पवार पुण्यात बोलत होते. यावेळी जरांगेच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होते आहे. या टीकेवर शरद पवार म्हणाले, जरांगेंचा आणि माझा संबंध जर विचारात घेतला, तर त्यांचे उपोषण सुरु झाल्यानंतर त्यांना भेटायला पहिला मी गेलो होतो. त्यांना भेटून एवढचं सांगितलं, 'तुमच्या मागण्याच्या संबंधित आग्रह मी समजू शकतो, पण दोन समाजात अंतर वाढेल, असं काही करू नका. महाराष्ट्राचे सामाजित ऐक्य टीकेल असं करा. तुमचा आग्रह मी समजू शकतो.पण इतर समाजासंबंधी कटूता ही योग्य दिसणार नाही', इतकचं माझ जरांगेंसोबत संभाषण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितलं. त्यानंतर आज अखेर एका शब्दानी माझं आणि त्यांचं बोलण झालं नाही, ना भेट झाली आहे, असे शरद पवार म्हणालेत.

हे ही वाचा : Lok Sabha : मविआच्या बैठकीनंतर राऊतांनी दिली सर्वात मोठी बातमी

राजेश टोपेंवरील आरोपावर काय म्हणाले? 

राजेश टोपेंवर देखील 100 टक्के चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला राजेश टोपेंची मदत सरकार घेत होते. कारण ते त्यांच्या शेजारी आहेत, त्यांनी मनधरणी करावी आणि कुठंतरी तोडगा काढावा, असं काही जबाबदार लोकांनी टोपेंना सुचवलं होतं. त्यामुळे राजेश टोपेंवर आरोप करणे म्हणजे एका बाजूने त्यांची मदत घेणे, दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर प्रहार करणे अशी आहे. सरकारची जर अशीच भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारशी सुसंवाद कोण करेल? कोण त्यांच्यावर विश्वास ठेवेलं, असे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Manoj Jarange : 'मला जर अटक झाली ना...'

मनोज जरांगेंची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावर शरद पवार म्हणाले, एसआयटी नेमा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमा आणि काय वाटेल ती चौकशी करा, आमची काही हरकत नाही, कारण कर नाही त्याला डर कशाला, असे शरद पवार स्पष्टच म्हणाले आहेत. तसेच हवं तप फोन आमचेही तपासा आणि त्यांचेही तपासा, माझ्यावर फोनवरून एक फोन जरी केला असेल आणि ते जर सिद्ध झालं, तर मी वाटेल ते मान्य करायला तयार आहे, असे देखील शरद पवार म्हणालेत. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT