Manoj Jarange : 'मला जर अटक झाली ना...', जरांगे पाटलांचा महायुती सरकारला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

 मला जर तुम्ही अटक केली ना, तर राज्यभरात आमरण उपोषण होणार. रस्त्या-रस्त्यावर आणि वावरा-वावरात मराठेच आमरण उपोषणला बसलेले दिसणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
manoj jarange patil warn cm ekanth shinde government sit inquiry demand maratha reservation devendra fadnavis
social share
google news

Manoj jarange Patil Warn Mahayuti Government :  इसरार चिश्ती, अंतरवाली सराटी :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या एसआयटी चौकशीची मागणी आज भाजप आमदारांनी केली आहे. या मागणीनंतर जरांगे पाटील चांगलेच भडकले आहेत. अटक पण करा आणि चौकशी ही करा आणि पण आता मागे फिरू नका. मला जर तुम्ही अटक केली ना, तर राज्यभरात आमरण उपोषण होणार. रस्त्या-रस्त्यावर आणि वावरा-वावरात मराठेच आमरण उपोषणला बसलेले दिसणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी (Manoj jarange Patil)  सरकारला दिला आहे.  (manoj jarange patil warn cm ekanth shinde government sit inquiry demand maratha reservation devendra fadnavis) 

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटीतला उपोषणस्थळी असलेला मंडप काढणार जाणार असल्याची चर्चा होती. यावर जरांगे पाटील म्हणाले, अंतरवालीचा मंडप मराठ्यांची महाराष्ट्राचा अस्मिता आहे. त्याने सव्वा दीड करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले. त्यांच मंडपनेही हे आरक्षण दिले. आणि सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी तेच देणार आहे. त्यांच मंडपने माझा करोडो मराठा एक केला आहे. ती अस्मिता आहे आमची, मंडप उचलता...व्यासपीठ उचलता.., छत्रपतींचा पुतळा उचलता... लावा हात त्याला...मराठ्यांच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही आणि मराठे घरात बसणार का? .. फडवणवीसांना दंगली घडवायच्यात का राज्यात? असा सवाल देखील जरांगेंनी उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा : Budget: 'महाराष्ट्र भवन'बाबत अजित पवारांची मोठी घोषणा

मला जर तुम्ही अटक केली ना, तर राज्यभरात आमरण उपोषण होणार आहे, तुम्हाला रस्त्या-रस्त्यावर आणि वावरा-वावरात मराठेच उपोषण करताना दिसणार आहेत. त्यामुळे  मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, असा इशाराच जरांगे पाटलांनी महायुती सरकारला दिला आहे. 

हे वाचलं का?

''उगच षडयंत्र रचून, मला गुतवून, माझ्या समाजाचं वाटोळ करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण मी काही समाजाचे वाटोळ होऊन देणार नाही. तुम्ही मला तुरुंगात टाकलं तर मी तुरूंगात सडेन, पण समाजाची निष्ठा विकणार नाही. मी माझ्या समाजाला माय-बाप म्हटलं तर त्यांच्याशी गद्दारीच करणार नाही'', असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. 
 
 तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे लागणार आहे, सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्यावे लागणार आहे. सगे सोयऱ्यांचे आरक्षण द्यायला काय अडचण आहे? ओबीसींच्या सगेसोयऱ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला अडचण काय? तुमच्याकडे जे मागितलं ते तुम्हाला देता येत नाही. जणगणना 1901 चे घेत नाही. 1881 ची जणगणना घेत नाही. तुम्ही हैदराबाद संस्थानच गँझेट, बॉम्बे गँझेटचे घेत नाही. जे खर आहे ते घेत नाही आणि थोट आमच्यात गळ्यात लटकवताय,अशी टीका जरांगे पाटलांनी सरकारवर केली. 

हे ही वाचा : Patanjali : पंतजलीच्या 'त्या' जाहिरातीवरून सुप्रीम कोर्टाने सरकारलाही फटकारले

''आमच्यावर खोट्या केसेस दाखल करणार, आमच्यावर दबाव आणणार, आमच्या अंतरवालीचे मंडप काढायला लावणार, आमची लोकं उचलून नेणार, काय अधिकार तुम्हाला आमची लोकं उचलून नेण्याचा? तुमचा ही काय पद्धत आहे, तुमची राज्य चालवण्याची, असा हल्ला देखील जरांगेंनी सरकारवर चढवला. 

ADVERTISEMENT

राजेश टोपेंच्या कारखान्यात दगड कुठून आले? असा सवाल पत्रकारांनी जरांगे पाटलांना केला होता.या आरोपावर जरांगे म्हणाले की, ते मला माहित नाही, ते त्यांना माहिती असेल, कुठून आले आणि कोणी बैठका घेतल्या.शांतते आ्ंदोलन करण्याचं आमचं पहिल्यापासूनच आव्हान आहे.आम्ही समर्थनच केलं नाही इतर गोष्टीच, सगळं तुमच्या जवळ आहे, फक्त खरं खरं करा. होऊ जा द्या आता दूध का दूध पानी का पानी, स्वागत आहे तुमच्या एसआयटी चौकशीचे, असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT