“अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न…”, शरद पवारांची मोठी राजकीय भविष्यवाणी
राज्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सातत्याने होतात. सुप्रिया सुळेंनीही याबद्दल विधान केले. या सगळ्या मुद्द्यावर शरद पवार यांनी मोठे राजकीय भाकित केले आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar On Ajit pawar : काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलं. अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू असं ते म्हणाले. फडणवीसांच्या याच विधानाच्या अनुषंगाने शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शरद पवारांनी मोठं भाकित केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या फडणवीसांच्या विधानावर शरद पवार म्हणाले की, “असं आहे की आमचा आग्रह हाच राहणार आहे की, आम्ही जे तीन पक्ष एकत्र आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचं उद्या राज्य यावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. जनमाणसात आम्ही जो प्रतिसाद पाहतोय. त्याचं मतामध्ये परिवर्तन झालं तर या तीन पक्षांचं राज्य येऊ शकतं. यात आणखी काही लोक सहभागी होतील. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष या सगळ्यांशी आम्ही बोलू”, असं पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विधानावर काय केलं भाकित?
त्यानंतर सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर पहिला हार घालणारी मी असेन. कारण बहीण त्यांच्यावर माझा हक्क जास्त आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “कसंय की हे स्वप्न आहे. ही काही घडणारी गोष्ट नाही.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
देवेंद्र फडणवीस काय बोलले होते?
राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होताहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते की, “पहिली गोष्ट… सहा महिन्यात काही गोष्टी बदलत नाहीत. त्यामुळे अजितदादांना जेव्हा मुख्यमंत्री बनायचं असेल तेव्हा संपूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू. हे काही सहा महिन्यांनी वैगरे काही होत नाही. जेव्हा संधी येईल तेव्हा बनवू त्यांना.”
समजून घ्या: दसरा मेळावा अन् शिवसेना… शिवाजी पार्कवरुन काय झालेला राडा?
याच मुद्द्यावर फडणवीस म्हणाले होते की, “आता तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो… एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल. म्हणून आपण हे डोक्यातून काढून टाका की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलला जाईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही बदलणार, नाही बदलणार…”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT