NCP: राष्ट्रवादी कुणाची? कोणी घेतला निकालाआधीच निवडणूक आयोगावर संशय?

प्रशांत गोमाणे

अजित पवार गटाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती.यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला होता. प्रफुल पटेलांच्या या विधानानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

sharad pawar vs ajit pawar whos ncp jitendra awhad doubt on the election commission decision
sharad pawar vs ajit pawar whos ncp jitendra awhad doubt on the election commission decision
Google CTA

राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आहे. मात्र येत्या 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येणे अपेक्षित असल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती.यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला होता. प्रफुल पटेलांच्या या विधानानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे. (sharad pawar vs ajit pawar whos ncp jitendra awhad doubt on the election commission decision)

काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे.आणि आमदारांच्या पाठिंब्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी आता निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या सुरुवातीला जितेंद्र आव्हाडांनी प्रफुल पटेल यांचे विधान लिहले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची निशाणी ही आम्हांलाच मिळणार आणि ती देखील 30 सप्टेंबरच्या अगोदर..असे आव्हाडांनी लिहले आहे.