मुंबई Tak चावडी: मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवारांचा विरोध होता,पण… जिंतेंद्र आव्हाडांनी सांगितली Inside Story
शरद पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊन मुंडेंचे घर तोडल्याचा आरोप होतो. या आरोपावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांचा याच्याशी काडीचाही संबंध नव्हता. याउलट त्यांचे मत घर तोडू नका असे होते.
ADVERTISEMENT
अजित पवार (Ajit pawar) यांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवार गटात धनंजय मुडेंसह (Dhananjay Munde) अनेक नेते गेले. याच धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यासाठी एकेकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोध केला होता. धनंजय मुंडेंबाबत शरद पवारांचा विऱोध का होता, याबाबतचा खुलासा आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुंबई तक चावडीवर (mumbai tak chavadi) केला आहे. शरद पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊन मुंडेंचे घर तोडल्याचा आरोप होतो. या आरोपावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांचा याच्याशी काडीचाही संबंध नव्हता. याउलट त्यांचे मत घर तोडू नका असे होते. यासाठी त्यांनी गोपिनाथ मुंडे यांना फोन करून ”गोपिनाथराव घरातला वाद मिटवा, बाहेर जातायत, हे होऊ देऊ नका, असा सल्ला देखील दिला होता. (sharad Pawar was against taking dhananjay munde in ncp Jitendra awhad told inside story on mumbai tak chavadi)
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आज मुंबई Tak चावडीवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी चावडीवर मुंबई तकवर दिलखुलास गप्पा मारल्या आणि काही धक्कादायक खुलासे देखील केले. शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना घरातून वेगळे केले, ही अत्यंत चुकीची माहिती आहे.याचा मी साक्षीदार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेण्यात जवळ जवळ वर्षभर विरोध केला होता. शरद पवार यांनी पंडींतांना मुंडेना तीन वेळा तोंडावर सांगितले की, मी हे करू शकत नाही. मला हे पटत नाही.घऱ फुटणे याच्यासारखं दुखं नाही. इतकंच नाही तर त्यांनी गोपिनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले गोपिनाथराव घरातला वाद मिटवा, बाहेर जातायत. हे होऊ देऊ नका, असा सल्ला त्यांनी गोपिनाथ मुंडे यांना दिला होता.
हे ही वाचा : शरद पवार नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला कारण…; जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा
शेवटी धनंजय मुंडेनीच सांगितलं तुम्ही घेणार असाल तर ठिक नाहीतर मी दुसऱ्या पक्षात जातो. आणि नंतर त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीत झाला असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यानंतर शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते.पण ते कधीकधी बोलत नाही अबोल राहतात, काही गोष्टी ते मनामध्ये दाबून ठेवतात,त्यामुळे आमच्या लोकांचे काम आहे जनतेसमोर जाऊन खरे सांगणे असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गोपिनाथ मुडेंची ‘ती’ फाईल
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी एक जुना किस्सा देखील सांगितला. गोपिनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर मोठा हल्ला केला होता. यावेळी मी मुंडेसाहेबांच्या विरोधातलं एक भयंकर मोठं डॉक्युमेंट त्यांच्या हातात दिलेलं, त्यांनी हे डॉक्युमेंट बघितलं आणि एका ड्रॉ़वरमध्ये फेकून दिले. यावर त्यांनी मला विचारणा केली, कोणी दिले तुला, तर मी सांगितल युपीएससीच्या एका तरूणाने दिले होते. शरद पवार यावर म्हणाले की, कोणी आपल्या कमरेखाली वार केला म्हणून आपणही त्याच्या कमरेखाली वार केला पाहिजे असे काही नाही आहे. राजकारण हे राजकारणासारखंच पाहिजे,सुड,द्वेश, बदला हे त्यात काही ठेवायचे नाही, विसरून जायचं. ते 1995 चे वर्ष होते आणि आता 2023 आहे, शरद पवार अजिबात बदलले नाहीत, मी याचा साक्षीदार असल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
हे ही वाचा : Mumbai Tak Chavadi : जितेंद्र आव्हाडांनी कुणाला घाबरून दहीहंडी केली बंद?
ADVERTISEMENT