Varun Sardesai यांच्यावर आठवड्यात दुसरा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड : हिंदुस्थान स्काऊट्स अँण्ड गाईड कथित फसवणूक प्रकरणात चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. या संस्थेचे अध्यक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणरे युवासेना सचिव वरूण सरदेसाई असल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच सरदेसाई यांच्यावर एक आठवड्यात शिंदे गटाने आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय आहे प्रकरण?

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) युवासेनेचे तालुकाप्रमुख अक्षय भूमकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करत असल्याचं पत्र अक्षय यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलं होतं. युवासेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला होता.

दरम्यान, अक्षय यांच्यावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशातच, रविवारी बाळासाहेबांची शिवसेना (युवासेना सहसचिव) शर्मिला येवले यांनी भूमकर यांची भेट घेतली. त्यानंतर बीडमधील आयोजित पत्रकार परिषदेत येवले यांनी सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच या प्रकरणात सरदेसाई यांच्या चौकशीची मागणीही येवले यांनी केली. तसं पत्रही त्यांनी बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलं आहे.

हे वाचलं का?

शर्मिला येवले म्हणाल्या, युवासेना पदाधिकाऱ्यांची आर्थिक फसवणूक करत आत्महत्येच्या दारात उभा करण्यास एकच विभागीय सचिव जबाबदार नाहीत. यात एक मोठी साखळी आहे आणि या साखळीची सुरुवात सरदेसाई यांच्यापासून होते. राज्यातील अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या संपूर्ण साखळीचा पर्दापाश करावा अशी मागणी शर्मिला येवले यांनी केली.

अक्षय भूमकर यांनी फेटाळले आरोप :

दरम्यान, शर्मिला येवलेंनी केलेले आरोप अक्षय भूमकर यांनी फेटाळून लावले आहेत. यासंबंधात एक व्हिडीओ प्रसारित करुन आणि प्रसिद्धीपत्रक काढून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भूमकर म्हणाले, येवले यांनी पत्रकार परिषदेत युवासेनेच्या नेत्यांवर खोटे आरोप केलेले असून त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.

ADVERTISEMENT

या गोष्टीचे कोणीही राजकारण करू नये. आत्महत्येचा प्रयत्न ताणतणावातून झालेला होता. तसंच आता आमचं आप-आपसांतील प्रकरण मिटलं असून या प्रकरणात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटेनाटे आरोप करू नये. युवासेना आमचं कुटुंब असून आम्ही परत एकदिलाने मिळून मिसळून कामाला लागू, असंही भूमकर यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT