भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!
भाजप आणि शिवसेनेत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून ओढताण सुरू आहे. शिवसेनेच्या काही जागांवर भाजपचा डोळा असल्याची राजकीय वर्तुळात सुरू असून, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra politics news : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपची तयारी सुरू असल्याने अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता शिवसेना आणि भाजपचे दोन नेते जागावाटपावरून आमने-सामने आले. (shiv sena bjp alliance latest news)
भाजप-शिवसेना युतीमध्ये लोकसभा मतदारसंघ आधीपासूनच निश्चित आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपची जोरात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या जागांवर भाजपकडून ऐनवेळी दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवारच नाही, असं विधान केलं होतं. तेव्हापासून या चर्चा सातत्यानं डोकं वर काढत आहेत.
हेही वाचा >> विनोद तावडे म्हणाले भाजपमध्ये परत या, एकनाथ खडसेंनी केलं मोठं विधान
आता त्यातच धाराशिवचे भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, “2024 मध्ये धाराशिवमध्ये भाजपचा खासदार व्हावा. आपल्या हक्काचे मोदी सरकार 2024 मध्ये पुन्हा यावे. त्यासाठी भाजपला धाराशिवची जागा जिंकावी लागेल.”
धाराशिव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सध्या इथे ठाकरेंच्या गटात असलेले ओमराजे निंबाळकर खासदार आहेत. पण, पक्षात झालेली फुटीनंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने इथे तयारी सुरू केली आहे. त्यातच राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या विधानाने शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत.