Dasara Melava 2023: ‘त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही…’, CM शिंदेंची ठाकरेंवर जहरी टीका

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shiv sena dasara melava 2023 azad maidan mumbai cm eknath shinde criticizes uddhav thackeray over congress alliance
shiv sena dasara melava 2023 azad maidan mumbai cm eknath shinde criticizes uddhav thackeray over congress alliance
social share
google news

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: मुंबई: ‘बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचतायेत. साहेबांनी ज्यांना-ज्यांना नाकारलं त्यांचे-त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करतायेत.’ अशा जहरी शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. (shiv sena dasara melava 2023 azad maidan mumbai cm eknath shinde criticizes uddhav thackeray over congress alliance)

ADVERTISEMENT

पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले

‘मैदान नाही विचार महत्त्वाचं आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमचं शिवतीर्थ आहे. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, गेल्या वर्षीही शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा करू शकलो असतो. पण राज्याचा प्रमुख म्हणून राज्यात शांतता असली पाहिजे म्हणून गेल्या वर्षी आपण बीकेसीत मेळावा केला. काही लोकं म्हणाले शिवाजी पार्क सोडायला नको होतं. परंतु मी त्यांना सांगितलं. जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआम मांडता येतात, बिनधास्त बोलता येतं.. तेच आपलं शिवतीर्थ..’

हे ही वाचा >> Dasara Melava 2023: ‘पुढचं येणारं सरकार एका पक्षाचं नको…’, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ

‘आज ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी वाभाडे काढले, त्यांचे आज गोडवे गायले जात आहेत. सावरकरांचा अपमान ज्या मणिशंकर अय्यरने केलं त्याला जोडे मारण्याचं काम बाळासाहेबांनी. त्याच काँग्रेसचे जोडे आज हे लोकं उचलत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.. पुढे आणखी काय होईल काही सांगता येणार नाही. कुर्निसात काय करतायेत, दिल्लीली काय जातायेत..’

हे वाचलं का?

‘बाळासाहेबांनी म्हटलेलं की, माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्ही मी माझं दुकान बंद करेल. हे बाळासाहेबांचे शब्द होते.’

हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘अरेरे तुम्ही काय गप्प बसू नका..’, जरांगेंची धनगर समाजाला हाक

‘बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही मूठमाती कधीच दिली आहे. काँग्रेस, समाजवादी पुढे एमआयएम.. कोणाला डोक्यावर घेतील, खांद्यावर घेतील काही सांगता येणार नाही. उद्या ओवेसीसोबत युती होईल. तेही कमी पडलं तर हमासचीही गळाभेट घेतील. किती लाचारी करणार.. स्वार्थासाठी?’

‘बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचतायेत. साहेबांनी ज्यांना-ज्यांना नाकारलं त्यांचे-त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करतायेत. त्यामुळे गद्दार कोण, महागद्दार कोण.. जनता सुज्ञ आहे.’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT