CM Shinde Exclusive: ‘नार्वेकरांनी ‘तो’ निर्णय दबावाखाली घेतला..’, मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

साहिल जोशी

ADVERTISEMENT

shiv sena rahul narvekar took the decision not to disqualify thackeray group mla under pressure chief minister eknath shinde made a big statement
shiv sena rahul narvekar took the decision not to disqualify thackeray group mla under pressure chief minister eknath shinde made a big statement
social share
google news

CM Shinde Big Statement on Rahul Narwekar: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता (MLA Disqualification) याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आपला निकाल सुनावला. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं जाहीर केलं. तसेच त्यांनी भरत गोगावले हेच प्रतोद (व्हीप) म्हणून वैध असल्याचं सांगितलं. पण याचवेळी नार्वेकरांनी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. पण ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न करण्याचा हाच निर्णय नार्वेकरांनी दबावाखाली घेतला असल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. (shiv sena rahul narvekar took the decision not to disqualify thackeray group mla under pressure chief minister eknath shinde made a big statement)

मुंबई Tak शी फोनवरून प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत असं म्हणाले की, ‘आम्हाला असं वाटतंय की, अध्यक्षांनी असा निर्णय का दिला? हे आमच्यासाठी अनपेक्षित आहे. दबावाखाली येऊन.. जे मीडियात चाललं आहे किंवा विरोधक जे दररोज त्यांना बदनाम करत होते.. मॅच फिक्सिंग वैगरे.. यामुळे त्यांनी हा ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही का? याचा देखील आम्ही चौकशी करू’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

‘शिवसेना शिंदेंचीच..’, निकालानंतर एकनाथ शिंदेंची मुंबई Tak सोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत

‘हा सत्याचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे.. म्हणूनच एकाधिकारशाही आणि जी मनमानी सुरू होती तिचा पराभव आहे. पक्ष लोकशाही मार्गाने चालवायला हवा होता.. पक्ष ही आपला स्वत:ची मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे असं समजून निर्णय घेणाऱ्यांसाठी हा एक मोठा धडा आहे. निश्चितपणे पक्षात लोकशाही असली पाहिजे.’

हे ही वाचा>> Uddhav Thackeray : “…मग आम्हाला अपात्र का केलं नाही?”, ठाकरेंचा नार्वेकरांना संतप्त सवाल

‘आम्ही लोकांना कोणतंही असं पाऊल उचललं नाही की, पक्षाचं काही नुकसान होईल. जेव्हा पक्षात चुकीचे निर्णय घेतले जाऊ लागले तेव्हा आम्ही आवाज उठवला. म्हणूनच लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. बहुमत हे आमच्याकडे आहे.. म्हणून निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे सोपावलं. आज विधानसभा अध्यक्षांनी देखील तेच ग्राह्य धरून निर्णय दिला. मी त्या निर्णयाचं स्वागत करतो. व्हीप जो आहे.. भरत गोगावले यांना वैध ठरवलं आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आमदारांनी हे नाकारलं नाही की, व्हीप त्यांना मिळाला नाही म्हणून. आम्हाला असं वाटतंय की, अध्यक्षांनी असा निर्णय का दिला? हे आमच्यासाठी अनपेक्षित आहे. दबावाखाली येऊन.. जे मीडियात चाललं आहे किंवा विरोधक जे दररोज त्यांना बदनाम करत होते.. मॅच फिक्सिंग वैगरे.. यामुळे त्यांनी हा ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही का? याचा देखील आम्ही चौकशी करू.’

‘मला असं वाटतं.. त्यांच्या विरोधात वारंवार जे आरोप लावत होते.. म्हणून असा निर्णय तर दिलेला नाही ना? कारण आमचा व्हीप बरोबर पोहचला होता सगळ्यांना. UBT चे आमदार आहेत त्यांनीही ही गोष्ट नाकारलेली नाही. त्यामुळे त्यांना अपात्र करायला हवं होतं. कारण मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना वैध ठरवलं आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Shiv Sena: ‘गुजरात लॉबीचं स्वप्न.. नार्वेकरांनी खंजीर खुपसला..’, निकालानंतर संजय राऊतांच्या संतापाचा कडेलोट

‘आम्ही आधी आजच्या निकालाबाबत सर्वात आधी तज्ज्ञांसोबत चर्चा करू आणि जो पुढचा निर्णय आहे तो करू.’ असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT