Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
उद्धव ठाकरे विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीलाही गेले. पण, इतकं सगळं सुरू असताना भाजपने उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत का? हा प्रश्न पुढे आला आहे. याच कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण!
ADVERTISEMENT

Maharashtr Political News : उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी भाजप नेत्यांकडून सोडली जात नसल्याचे दररोज दिसतंय. मुद्दा मुंबईतील असो वा महाराष्ट्रातील. मुद्दा हिंदुत्वाचा असो की इतर कुठला. भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. उद्धव ठाकरेंही भाजपसोबत लढण्याची भाषा करताहेत. उद्धव ठाकरे विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीलाही गेले. पण, इतकं सगळं सुरू असताना भाजपने उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत का? हा प्रश्न पुढे आला आहे. याच कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण!
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांच्या सुरू असलेल्या बैठकांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी यांचा भेटून फोटो काढण्याचा एक कार्यक्रम झाला. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांच्या इतिहास बघितला तर कळेल की, त्या सगळ्यांनी मिळून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची ग्यारंटी आहेत.”
विरोधकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच घेरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकांत विरोधकांना घेरण्याची अजेंडा स्पष्ट केला. 2014 मध्ये भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरूनच काँग्रेस प्रणित युपीएला घेरलं होतं. आता पुन्हा एकदा भाजप त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या तयारी आहेत. कारण मोदींनी कार्यकर्त्यांना यांचे घोटाळे लोकांपर्यंत पोहोचवा असंही सांगितलं.
शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंबद्दल मौन
पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनच पाटण्यातील बैठकीला हजर असणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते गेले होते.