Sushilkumar Shinde : कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नेता ठरवणार!
सुशीलकुमार शिंदे यांची कर्नाटक निरीक्षण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती मुख्यमंत्रीपदीसाठी नाव सुचवणार आहे.
ADVERTISEMENT
who will be next chief minister of karnataka : तब्बल तीन दशकानंतर कर्नाटकात इतिहास घडला. कर्नाटकातील मतदारांनी काँग्रेसला प्रचंड बहुमताचा कौल देत भाजपला सत्तेतून पायउतार केलं. कर्नाटकात मोठी मुसंडी मारत काँग्रेसने सत्ता काबिज केली आहे. 224 पैकी 135 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयामुळे काँग्रेसमध्ये नवीन उर्जा संचारली असून, मुख्यमंत्री कुणाला करायचे याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
काँग्रेसकडून कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री पदाचे दोन दावेदार आहेत. एकीकडे कर्नाटक माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांचं नाव आहे, तर दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे नाव चर्चेत आहे. आता या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पण, महत्त्वाची बातमी म्हणजे कर्नाटकाचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीने माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
सुशीलकुमार शिंदेंचा बंगळुरूत मुक्काम
अशातच कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पर्यवेक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> संजय राऊत ‘तसं’ बोलून फसले! राणेंसारखी पुन्हा ‘जेल’वारी घडणार?
बंगळूरमध्ये काय आणि कशा पद्धतीने निर्णय होतोय हे पाहून निर्णय घेण्यात येईल. पक्षामध्ये सर्वांशी विचार विनिमय करुन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा लागतो. काँग्रेस हाय कमांडशी बोलून निर्णय घ्यावा लागेल असं सुशीलकुमार शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर दोन सहनिरीक्षक असणार आहेत. आमदारांनी मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले आहेत. शिंदेंनी दिलेल्या अहवालावर तसेच काँग्रेस हाय कमांडशी चर्चा करुन मुख्यमंत्री पदासाठीचे नाव ठरविणार आहे. नव्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्येच ठाण मांडून बसणार आहेत.
ADVERTISEMENT
काँग्रेसने ही जबाबादारी सुशीलकुमार शिंदे यांच्यावरती का टाकली?
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. सुरुवातीपासूनच ते काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी या आधी केंद्रात गृहमंत्री पद देखील सांभाळले आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील त्यांनी भूषवले आहे. त्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT