‘खासदार बायका नाचवतो, जिल्ह्यात फिरला तर कपडेच…’, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची शिंदेंच्या खासदाराला धमकी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

thackeray group threat to cm eknath shinde mp hemant patil thackeray vs shinde shivsena supreme court
thackeray group threat to cm eknath shinde mp hemant patil thackeray vs shinde shivsena supreme court
social share
google news

Hemant Patil Threat to thackeray Group : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. यानंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, यावर आजपासून सुनावणी पार पडतेय. या सुनावणी दरम्यानच ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात या निर्णय़ावर सुनावणी पार पडत असताना, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदेच्या खासदाराला धमकी दिली आहे. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) जर जिल्ह्यात फिरले तर त्यांचे कपडे काढू, असा धमकीवजा इशारा ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्याने शिंदे गटाच्या (Shinde Group) खासदाराला दिला आहे. (thackeray group threat to cm eknath shinde mp hemant patil thackeray vs shinde shivsena supreme court)

ADVERTISEMENT

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. याच आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांचे हिंगोलीत धरणे आंदोलन सुरु आहे. ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख विनायक भिसे व संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील कार्यालयासमोर सुरु होते. या धरणे आंदोलना दरम्यान विनायक भिसे यांनी हेमंत पाटील यांना धमकी दिली आहे.

हे ही वाचा : PM Modi Speech in Parliament : मोदींनी नेहरूंचं केलं कौतुक, काय म्हणाले?

मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम असताना हा खासदार बायका नाचवतो, असा गंभीर आरोप सुरुवातीला विनायक भिसे यांनी हेमंत पाटील यांच्यावर केला. तसेच हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे यापुढे खासदार हेमंत पाटील जर जिल्ह्यात फिरले तर त्यांचे कपडे काढू, असा धमकीवजा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी हेमंत पाटील यांना दिला आहे. आता या धमकीवर शिदें गटाचे खासदार हेमंत पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Pune Murder : दारू पिऊन दोस्तीत केली कुस्ती, अन् नंतर सगळं भयानकच घडलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT