‘नितीन गडकरींच्या खात्याचे घोटाळे PM मोदींनीच…’ ठाकरेंच्या खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
भाजपकडून नितीन गडकरींना संपवण्याचा डाव सूरू असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या. त्यात आता ठाकरेंचे खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
ADVERTISEMENT
कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे ताषेरे ओढण्यात आले होते. या भ्रष्टाचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari). यावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या. त्यात आता ठाकरेंचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. (thackeray mp vinayak raut criticize narendra modi on nitin gadkari cag dwarka express project)
ADVERTISEMENT
देशातील नवीन प्रकल्पाचा कॅगने रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्यात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. भाजपच्या बेशरम वरिष्ठ नेतृत्वाने असा नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदीचा उल्लेख करत विनायक राऊत यांनी त्यांनीच हे घोटाळे उघड केल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून नितीन गडकरींसाठी हा कट रचल्याचे देखील विनायक राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा : शरद पवार-अजित पवार भेटीचं संजय राऊतांनी सांगितलं तिसरंच कारण; शिदेंना दिला इशारा
पण नितीन गडकरी यांना संपवण्याचा हा कट महाराष्ट्र उधळून लावेल. तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही फक्त आवाज द्या, इंडियामध्ये या…तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द तुम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा देतील, अशी ऑफरच विनायक राऊत यांनी गडकरींना देऊन टाकली.
हे वाचलं का?
तसेच अख्ख्या देशात भ्रष्टाचारी राजवट सुरु आहे. कोरोनाच्या माध्यमातून पीएम केअर फंडात किती हजार कोटीचा निधी जमा झाला.देशातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना त्यात पैसे दिले, पण त्याचा हिशेब द्यायचा नाही, अशी टीका देखील राऊत यांनी मोदींवर केली.
दादा-गद्दार चायनीज माल..
नितीन गडकरींच्या भाजपच्या दुकानावर जुने ग्राहक दिसत नसल्याच्या विधानावर विनायक राऊत यांना प्रतिक्रिया दिली आहे.नितीन गडकरी खरंच बोलले, आमचं दुकान चांगलच चाललंय. भाजपचं दुकानही सध्या तेजीत आहे. पण दुकानामध्ये पुर्णपणे चायनीज माल आहे, दादा चायनीज, गद्दार चायनीज, चार दिवस चालतील आणि बंद होतील टीका विनायक राऊत यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेवर केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sambhaji bhide:’देशाची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचे…’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान
नितीन गडकरी काय म्हणाले?
द्वारका एक्सप्रेससंबंधीत घोटाळा झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. उलट द्वारका एक्सप्रेसमध्ये 12 टक्के पैसे वाचवण्यात आल्याचा दावा नितीन गडकरी यांनी आज तकशी बोलताना केला आहे. कॅग ज्याला 29 किलोमीटर म्हणत आहे. तो 230 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आहे. यात 6 टनेल आणि 563 किमीचा एकून लेन रोड आहे. जो टेंडर निघाला आहे, तो 206 प्रति किलो मीटरसाठी होता. त्यामुळे एक्सप्रेसमध्ये 12 टक्के पैसे वाचवण्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT