‘त्या’ निकालानंतर शरद पवारांचं मोठं विधान, ‘उद्धव ठाकरेंची केस…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray case of MLA disqualification is strong, Sharad Pawar advised to go to Supreme Court
Uddhav Thackeray case of MLA disqualification is strong, Sharad Pawar advised to go to Supreme Court
social share
google news

Sharad Pawar : राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्यानंतर त्यावर पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांच्या या निकालामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) केस ही भक्कम असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जावे असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला आहे.

ADVERTISEMENT

गाईडलाईन बदलणार

राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर आता त्यावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदारांना अपात्र केले नसले तरी ही निर्णय सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन बदलण्याचा निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.

न्यायालयच निर्णय देणार

आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे, मात्र या निकालामुळे वेगळा पायंडा पडण्याची शक्यता असल्याचे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> MLA Disqualification: CM शिंदेंविरोधात निकाल गेला तर.. असं बदलेल महाराष्ट्राचं राजकारण

शिंदे गटानुसारच निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, शिवसेनच्या निकालावर बोलताना त्यांनी हे ही सांगितले की, हा निकाला असाच लागणार होता हे आधीच दिसून येत होतं. कारण निकाल लागण्याआधीपासूनच शिंदे गटाकडून निकाल काय लागणार होता अशी वक्तव्यं केली जात होती. त्यामुळे शिंदे गटाच्या  मतानुसारच हा निकाल लागल्याचेही त्यांनी खोचकपणे सांगितले.

न्याय मिळू शकेल

या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाची जी गाईडलाईन आहे, ती गाईडलाईनच बदलण्याचा निर्णयच या निकालामुळे दिसून आला आहे. शरद पवार यांनी यावेळी विधीमंडळ आणि पक्षसंघटना यामधीलही त्यांनी फरक सांगितला. यावेळी ते म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा पक्षसंघटनेचा निकाल आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले तर नक्कीच त्यांची ही केस भक्कम असल्याचे सांगत त्यातून त्यांना न्याय मिळू शकेल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ram Mandir: सोनिया गांधी राम मंदिरात जाणार की नाही?, जाहीर केला मोठा निर्णय

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT