Uddhav Thackeray : ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार! 'गल्लीत बॅटबॉल खेळला म्हणून BCCI चा अध्यक्ष...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav thackeray criticize amit shah jay shah bcci dharashiv umarga rally maharashtra politics
''मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, पण तुम्ही निवडून दिलं तर होणार आहे.
social share
google news

Uddhav thackeray criticize amit shah jay shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दोऱ्यावर असताना, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय,अशी टीका केली होती. या टीकेचा आता उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. 'काय आहे जय शाह? कोण आहे जय शाह? काय त्याच कर्तृत्व? क्रिकेटमध्ये योगदान काय? गल्लीत बॅटबॉल आम्ही पण खेळलो आहोत, म्हणून काय मी बीसीसीआयच अध्यक्ष व्हायचं,' असा सणसणीत टोला ठाकरेंनी (Uddhav thackeray)  अमित शाहांना (Amit shah) लगावला आहे. (Uddhav thackeray criticize amit shah jay shah bcci dharashiv umarga rally maharashtra politics )

उद्धव ठाकरे धाराशीवमधील सभेत बोलत होते. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली. 'मोदी मेरा परिवार म्हणतात, पण जबाबदारी कोण घेणार? मी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण तुम्ही तयार आहात का? ते आधी सांगा?, असा सवाल ठाकरेंनी मोदींना केला. 

हे ही वाचा : 'आम्ही 115 तरी तुम्हाला..', फडणवीसांनी एका वाक्यात..

 ''मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, पण तुम्ही निवडून दिलं तर होणार आहे. जनतेने निवडून दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद म्हणजे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद नाही, जसं तुम्ही जय शाहला बसवलंत'', असा टोला ठाकरेंनी अमित शाहांना लगावला. तसेच काय आहे जय शाह? कोण आहे जय शाह? काय त्याच कर्तृत्व आहे. काय त्याच क्रिकेटमध्ये योगदान आहे. गल्लीत बॅटबॉल आम्ही पण खेळलो आहोत. म्हणून काय मी बीसीसीआयच अध्यक्ष व्हायचं, असा चिमटा देखील ठाकरेंनी अमिक शाहांना काढला.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदेंवर डागलं टीकास्त्र 

'हे मिंधे लाचार शेपूट हलवत, त्यांची खुर्ची चाटत भिकेचे कटारे घेऊन बसले आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेतायत', अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली.  'सरकारला आता दोन वर्ष होत आली, पावने दोन वर्ष झाली.घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रावर राज्य करतेय, महाराष्ट्र लुटला जातोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि सरकार या लुटालुटीत सामील होत आहे आणि तरीसुद्धा आम्ही त्याला मतं द्यायची. इतकी लाचारी महाराष्ट्रात कधी झाली नव्हती. आणि एवढा लालघोटेपणा यापुर्वी महाराष्ट्रात कधी पाहायला नव्हता,अशी टीका देखील ठाकरेंनी यावेळी केली. 

हे ही वाचा : Crime : आधी भांडण झाली, मग गळाच घोटला; नवऱ्याने बायकोला का संपवलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT