Uddhav Thackeray : ठाकरे PM मोदींवर कडाडले, 'धारावी अदाणींच्या घशात....'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

पंतप्रधानांच्या मित्रासाठी अदाणीसाठी मुलुंडची मिठागराची जागा देऊन टाकली, हाच का तुमचा सबका साथ, सबका विकास. म्हणजेच साथ सगळ्यांची हवी आहे,
uddhav thackeray criticize pm narendra modi on gautam adani dharavi project maharashtra politics
social share
google news

Uddhav Thackeray criticize PM Narendra Modi  : 'तुमची घरे बांधेपर्यंत तुम्ही मिठागरात जाल, पण एकदा का तुम्ही मिठागरात गेलात तर परत तुम्हाला धारावी दिसणार नाही. कारण ही जागा दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही तर अदाणींच्या घशात घातली जातेय' अशी टीका 
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केली आहे.  (uddhav thackeray criticize pm narendra modi on gautam adani dharavi project maharashtra politics) 
 
उद्धव ठाकरे धारावीतून बोलत होते. सध्या ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देत आहे. यानिमित्तच धारावीतून बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. 'मी मुख्यमंत्री असताना काजुरमार्गची जागा मागत होतो,तेव्हा दिली नाही, पण आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी अदाणीसाठी मुलुंडची मिठागराची जागा देऊन टाकली, हाच का तुमचा सबका साथ, सबका विकास. म्हणजेच साथ सगळ्यांची हवी आहे, पण विकास माझ्या मित्रांचाच व्हावा, म्हणजे सब का साथ मित्र का विकास', असा टोला ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : बलात्कार, मॉरिस अन् दाऊद.. हादरवून टाकणारी Inside Story

'तुमची घरे बांधेपर्यंत तुम्ही मिठागरात गेलात, पण एकदा का तुम्ही मिठागरात गेलात तर परत तुम्हाला धारावी दिसणार नाही. कारण ही जागा दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही तर अदाणींच्या घशात घातली जात आहे. आणी ही जागा परत काय मिळणार नाही', अशी टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : NCP : 'माझ्याऐवजी अजित पवार प्रदेशाध्यक्षही झालेले...' जयंत पाटलांचा 'चावडी'वर गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे म्हणाले की,  'विरोधकांच्या मागे काही लावून द्यायचं आणि त्यांना फोडून आपल्या पक्षात घ्यायचं.  आपल्यातील नाही मात्र इथले तिथले काही लोक त्यांच्यात गेले आहेत. विकाऊ माल विकला गेला हरकत नाही. मात्र माझे निष्ठावंत मावळे माझ्यासोबत आहेत तोपर्यंत चिंता नाही.' 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT