Uddhav Thackeray: 'फडणवीस निर्लज्जम सदासुखी', ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पुन्हा घणाघात

ADVERTISEMENT

shivsena
uddhav thackeray
social share
google news

Udhav Thackeray : सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा सुरु आहे. या जनसंवाद यात्रेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून ते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत फडणवीस म्हणजे, 'मला नाही अब्रू मी कशाला घाबरू 'अशी त्यांची अवस्था झाली असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

नालायक म्हटलं कलंक म्हटलं

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांना म्हणाले की, 'गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आता कोणत्या शब्दात वर्णन करायचं तेच कळत नाही. कारण त्यांना फडतूस म्हटले, नालायक म्हटलं कलंक म्हटलं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. कारण त्यांची अवस्था म्हणजे निर्लज्जम सदासुखी अशी झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

हे ही वाचा >>'अशोक चव्हाणांना काँग्रेसनं काय कमी केलं?'

निष्ठेला किंमत नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांचा पाव मुख्यमंत्री केला तरीही ते आनंदात आहेत. नितिन गडकरी म्हणतात की, 'कारण जो निष्ठेने काम करतो, त्याला किंमत नाही हेच खरं आहे' असा संदर्भ देतही त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसऱ्यांचा पक्ष फोडता

उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'तुमच्या मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडता, आमची शिवसेना तुम्ही आमच्या नेत्यांना पळवता. तुमची भाजपा तुम्हाला पूर्ण वाटत नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.'

दिल्लीवर शेतकऱ्यांची धडक

दिल्लीतील शेतकरी मोर्चावर बोलताना म्हणाले की,'ज्या दिल्लीच्या तख्तावर शेतकऱ्यांनी धडकी मारली आहे, त्यांना तुम्ही कधी भेटणार? त्यांच्या मागण्या तुम्ही कधी पूर्ण करणार?' असा सवालही त्यांनीही यावेळी उपस्थित केला आहे. 

ADVERTISEMENT

'भाजप' कृषी धोरणाविरोधात 

ज्या शेतकऱ्यांना अडविण्यासाठी जे देशाचे सैन्य त्यांच्या वाटेत ठेवले आहेत, ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची पोरं असल्याचं सांगत त्यांनी केंद्राच्या कृषी धोरणावरूनही त्यांनी हल्लाबोल केला. जे शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, त्याच शेतकऱ्यांवर तुम्ही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडता, त्यांच्यावर लाठीचार्ज का करता असा सवाल करून त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली  आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 'काँग्रेसची पुण्याई सोडून नेते आमच्यासोबत का येतात?'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT