Uddhav Thackeray : 'जरांगेंना मारण्याचा कट'; ठाकरे म्हणाले, 'त्याची...'
Uddhav Thackeray Manoj Jarange SIT Probe : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मनोज जरांगेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले?
ठाकरेंचा रश्मी शुक्लांना टोला
जरांगेंची सरकारकडून एसआयटी चौकशी
Uddhav Thackeray on Sit Inquiry of Manoj Jarange Protest : अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी या मुद्द्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी भूमिका मांडली.
जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी लावण्यात आली आहे. जरांगे पाटलांचे बोलविते धनी हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राजेश टोपे आहेत, असे आरोप भाजपने केले आहेत. या आरोपांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला सुनावले.
महिलांची डोकी फोडली, छऱ्याच्या गोळ्या घातल्या...
उद्धव ठाकरेंनी सरकारला कानपिचक्या लगावत भाष्य केले. ठाकरे म्हणाले, "बघा, मला असं वाटतं की हे अत्यंत निर्घृण प्रकार आहे. ज्यावेळी जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले होते. त्या काळात म्हणजे १ ऑगस्ट... इंडियाची बैठक झालेली. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर निर्घृण लाठीहल्ला झाला."
"अश्रुधुर सोडले. छर्ऱ्याच्या गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. महिलांची डोकी फोडली होती. शरद पवार गेले होते. मी सुद्धा गेलो होतो. जणू काही हे अतिरेकी घुसले असं त्यांना वागवलं गेलं", असे म्हणत ठाकरेंनी या प्रश्नाला उत्तर दिले.










