Lok Sabha 2024 : ठाकरेंची लोकसभेसाठी रणनीती! 10 शिलेदार उतरवले मैदानात

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray announces list of region wise party leader for lok sabha election 2024
Uddhav Thackeray announces list of region wise party leader for lok sabha election 2024
social share
google news

Maharashtra Politics, Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केल्याचं दिसत आहे. राज्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाकरेंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 10 नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना करण्यात आली आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागीय नेते जाहीर करण्यात केले आहेत. या नेत्यांच्या माध्यमातून ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांना राजकीय कार्यक्रम दिले जात आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 10 नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. याच स्ट्रॅटजीचा भाग म्हणून जानेवारीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबीर आयोजित केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ठाकरेंच्या सभा होणार असून, त्यांचे नियोजन लवकर जाहीर केले जाणार आहे. महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रविवारी (26 नोव्हेंबर) विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दहा नेत्यांवर ठाकरेंनी सोपवली विशेष जबाबदारी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘नेते’ मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली आहे. आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकलं आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी 10 नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह, नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी, अरविंद सावंत पश्चिम विदर्भ, तर भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Deepak Kesarkar :’…तर तुम्हाला अपात्र करेन’, मंत्री केसरकर भावी शिक्षिकेवर का भडकले?

अनिल देसाई पश्चिम महाराष्ट्र, राजन विचारे ठाणे-पालघर, चंद्रकांत खैरे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांच्याकडे मराठवाडा तर अनंत गीते, विनायक राऊत यांच्याकडे कोकणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर जानेवारी महिन्यात होणार आहे.

ADVERTISEMENT

कोणत्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?

संजय राऊत
उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)

अनंत गीते
कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण)

चंद्रकांत खैरे
मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना

हेही वाचा >> ‘…फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका’, मराठा आरक्षणावरून भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

अरविंद सावंत
पश्चिम विदर्भ
लोकसभा मतदारसंघ बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा

अनिल देसाई
पश्चिम महाराष्ट्र
लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी

भास्कर जाधव
पूर्व विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर

विनायक राऊत
कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी, सिंधुदुर्ग

राजन विचारे
कोकण (ठाणे, पालघर)
लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर

रवींद्र वायकर
मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ नांदेड, हिंगोली, परभणी

सुनील प्रभू
मराठवाडा, सोलापूर
लोकसभा मतदारसंघ सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड

    follow whatsapp

    ADVERTISEMENT