Maharashtra : उद्धव ठाकरेंवर भडकले बावनकुळे; म्हणाले, "तुम्ही मिंधे..."
Uddhav Thackeray Chandrashekhar bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी ए. राजा यांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखऱ बावनकुळे यांची टीका
ए. राजा यांच्या विधानामुळे वाद
बावनकुळे ठाकरेंना म्हणाले मिंधे
Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankule : भारत हे एक राष्ट्र नाही, या विधानावरून वाद निर्माण झाला असून, भाजपने यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ए. राजा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना मिंधे म्हणत खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "भारत हे एक राष्ट्र नाही, अशी भारतविरोधी भूमिका, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा कधीच स्वीकार करणार नाही, ही राक्षसी महत्वाकांक्षा आणि राम किंवा रामायणावर विश्वास नाही.. असा माज करणारे द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा कसला राजा हा तर भिकारी!! हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे दिवटे कर्नाटकचे मंत्री प्रियांक करतात", असं टीकास्त्र बावनकुळे यांनी डागले आहे.
हेही वाचा >> 'आता संसदेतूनच...', वडेट्टीवारांची कन्या लोकसभेच्या रिंगणात!
"सनातन हिंदू धर्माचा अपमान इंडी आघाडीतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी करतात... आणि आत्ता ए. राजा यांनी हद्दच केली. राष्ट्रविरोधी विधान करून आमचे आराध्य प्राणप्रिय प्रभू श्रीराम, रामायण आणि महावीर हनुमंताचे अस्तित्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला", असंही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> "...हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा", ठाकरेंचा मोदींवर हल्ला
"उद्धव ठाकरेजी, हेच आहेत ना तुमचे मित्र आणि नवे नेते... सावरकरांचा अपमान तुम्ही मिंधे होऊन सहन केला. आता भारतमाता, प्रभू श्रीराम, रामायण आणि हनुमानाचा अपमान तुमचे निर्लज्ज सवंगडी करू लागले...यासाठीच तुम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली, बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब लिहू दिले. अरेरे, तुमच्याबद्दल आता कणव वाटू लागली आहे", असे खडेबोल बावनकुळे यांनी सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT