“हिटलर असाच माजला होता”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना दिलं चॅलेंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav Thackeray challenge to pm narendra modi. he said show us that you can go to manipur also.
uddhav Thackeray challenge to pm narendra modi. he said show us that you can go to manipur also.
social share
google news

Uddhav Thackeray today speech : शिवसेनेचे (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण डागले. शाह मणिपूरमध्ये गेले, तरी तिथले लोक जुमानत नाहीये. मोदी मणिपूरमध्ये जाण्याऐवजी अमेरिकेला चाललेत’, असं म्हणत ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं. हिटलरच्या सत्तेचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केलं.

मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या एनएससीआय डोम येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर झाले. या शिबिरात बोलताना ठाकरेंनी थेट मोदी-शांहांवरच हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं. त्याचबरोबर इतर मुद्द्यांवरून भाजपला टोला लगावला.

उद्धव ठाकरे मोदी-शाहांबद्दल काय बोलले?

भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांचे दूत जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत कितीही शाह आणि अफजलखान आले तरी मला परवा नाही. तेव्हा मी म्हटलं होतं की, अफजल खानाची फौज येतेय. लोक म्हणाले काय बोलता आहात. आता कळलं ना तुम्हाला अफजल खानाची फौज.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं

“एवढीच जर तुम्हाला मस्ती दाखवायची असेल, तर मणिपूरमध्ये दाखवा. ईडी, सीबीआय तिकडे पाठवा. लोक जाळून टाकतील. अगदी अमित शाहांनाही जुमानत नाहीये. मोदी आता अमेरिकेत चाललेत, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाहीये. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार आहेत. माझ्या देशातील एक भाग पेटलेला आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवल्याची भाकड कथा सांगितली. ही कथा सत्य करायची असेल, तर मणिपूरमध्ये जा. आधी तर मोदींनी मणिपूरमध्ये फक्त जाऊन दाखवावं. लोक ऐकतात का बघू”, असं आव्हान ठाकरेंनी मोदींना दिलं.

जनता पक्षाची लाट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा

यावेळी ठाकरेंनी जुना किस्साही उपस्थितांना ऐकवला. ते म्हणाले, “आणीबाणीचा काळातील राजवट मला आठवते. जनता पक्षाची लाट होती. शिवसेनाप्रमुखांना शिवसेना भवनात सांगितलं होतं की, आपली शिवसेना राहिलेली नाही. तुमच्या मनात जी शिवसेना वाटतेय, ती तुमच्या आजूबाजूला असलेल्या आठ दहा सुरेमारेवाले आहेत, तेवढ्यापुरती आहे. आपल्याला जनता पक्षात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की, आठ दहा असले, तरी कट्टर आहेत. त्यांना सोबत घेऊन माझी शिवसेना पुन्हा उभी करून दाखवेन.”

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी आपल्यात एकजूट नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पानिपतच्या युद्धाचा हवाला दिला. ठाकरे यावेळी म्हणाले, “पानिपतच्या युद्धाआधी अब्दाली बाहेरून फौजा घेऊन आला होता. एका टेकडीवरून जाती जमातीत विखुरलेलं पण, अथांग पसरलेलं मराठ्यांचं सैन्य बघत होता. तो चिंतेत होता की, सैन्य लढवय्ये आहेत. हार मानत नाही. अब्दालीने खबऱ्याला विचारलं. खबऱ्या म्हणाला, ‘कठीण आहे. ते लढवय्ये आहेत. ते पराक्रमी आहेत. पण, ते जाती जमातीत विखुरले गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या चुली वेगळ्या आहेत.’ त्यानंतर अब्दाली म्हणाला, ‘बस्स. उद्याचं युद्ध आपण जिंकलं.’ तो म्हणाला ‘जे जेवायला एकत्र येत नाही, ते लढायला आणि मरायला का कसे एकत्र येतील.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश’, संजय राऊतांनी मोदी-शाहांवर डागली तोफ

“पूर्वी एक काळ असा होता की, मातोश्रीवर भाजपचे लोक यायचे. आता भाजप सोडून इतर सर्व पक्षाचे नेते यायला लागलेत. कारण भाजपला शिवसेनेचे महत्त्व नाही कळलं. त्यांना सुखात साथ देणारेच हवेत. पण, उद्या सत्ता गेल्यावर रस्त्यावर फिराल तेव्हा तुम्हाला विचारायला एकही मित्र येणार नाही, हे लिहून ठेवा”, असं ठाकरे यावेळी भाजपला म्हणाले.

“पाटण्याला मी मुद्दाम चाललोय. पत्रकार विचारतात की, विरोधी पक्षाची एकजूट होईल का आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? केवळ भाजप सत्तेत बसलीये म्हणून आम्ही विरोधी पक्ष नाही. ही एकजूट विरोधी पक्षांची नाहीये, तर देशप्रेमीची होणार आहे. स्वातंत्र्याच्या रक्षणकर्त्यांची एकजूट होणार आहे”, असं उत्तर ठाकरेंनी विरोधकांच्या एकजुटीबद्दल उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर दिलं.

हिटलरचा मुद्दा, ठाकरे काय म्हणाले?

“देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना ट्विटरचा माजी सीईओ जॅक डॉर्सीला आपल्या सरकारकडून धमक्या दिल्या गेल्या. शेतकरी आंदोलनाबद्दलची ट्विट वगळा नाहीतर तुमच्या देशातील कार्यालयांवर धाडी टाकू. तुम्हाला त्रास देऊ. हिटलरसुद्धा असाच माजला होता. त्याने केलेली लोकांची कत्तल डोळ्यासमोर येतं. याची सुरूवात कशी झाली? त्या पक्षाने माध्यमांवर नियंत्रण आणलं. विरोधातील बातम्या येणार नाही, हे बघितलं. एक एक करत विरोधी पक्ष संपवत गेले. विरोधी पक्षाच्या समर्थकांचा छळ केला. एकच पक्ष ठरवायला लागला की, सत्य काय आहे. आम्ही म्हणू तेच सत्य हे ठरवायला लागला. हे सगळं डोळ्यासमोर घडत असताना सर्वसामान्य जनता निपचित पडून राहिली तेव्हा हिटलर माजला. आपल्या देशाची वाटचाल हिटलरच्या दिशेने तर नाहीये ना”, अशी चिंता व्यक्त करताना ठाकरेंनी मोदींवर प्रहार केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT