9 वर्ष सत्तेत असतानाही हिंदूंना…, ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

udhhav thackeray criticize pm narendra modi on hindutwa and opposition india party maharashtra politics
udhhav thackeray criticize pm narendra modi on hindutwa and opposition india party maharashtra politics
social share
google news

जगातला सर्वात शक्तिमान नेता, महाशक्ती, विश्वगुरू असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवून, 9 वर्ष सत्तेत असतानाही हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो, मग तुमचं हिंदुत्व गेलं कुठं? असा खरमरीत सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. तसेच कॉँग्रेसच्या वेळेस इस्लाम धोक्यात होता, आता हिंदुत्व धोक्यात आहे, मग हिंदुत्ववादी कोण? असा खडा सवालच ठाकरे यांनी पंतप्रधानांना केला. (udhhav thackeray criticize pm narendra modi on hindutwa and opposition india party maharashtra politics)

ADVERTISEMENT

शिवसेना आणि संभाजी ब्रिग्रेडच्या संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. 9 वर्ष झाली जगातला सर्वात शक्तिमान नेता, महाशक्ती, विश्वगुरू देशावर राज्य करत असताना हिंदुंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो, मग तुमचं हिंदुत्व गेलं कुठं? कॉँग्रेसच्या वेळेस इस्लाम धोक्यात होता, आता हिंदुत्व धोक्यात आहे, मग हिंदुत्ववादी कोण? असा सवालच ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.

हे ही वाचा : जयंत पाटलांना भाजपची ऑफर? जितेंद्र आव्हाड म्हणाले…”सत्ता येते जाते”

उद्धव ठाकरे यांनी देशातील विरोधी पक्षाच्या इंडिया पक्षावरून झालेल्या टीकेचाही समाचार घेतला आहे. भाजपकडून विरोधकांच्या एकजुटीच्या इंडियाला इंडियन मुजाहिद्दीन म्हणत टीका केली होती.या टीकेवर आता उद्धव ठाकरे म्हणाले, विदेशात तुम्ही प्राय मिनिस्टर ऑफ इंडिया आहात, तेव्हा तुम्ही देशाचे पंतप्रधान मोदी म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता,असा सवाल करत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

प्रबोधनकारांच, बाळासाहेबांचं, उद्धव ठाकरेंचं, आदित्य ठाकरेंचे हिंदुत्व वेगळं, असं वेगळं वेगळं हिदुत्व नाही, पण काळानुरूप आपल्याला काही भूमिका घ्यावा लागतात. तशी आता मी भूमिका घेतल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. यासोबत आमचं हिदुत्व हे शेंडी जाणव्यांचं हिदुत्व नाही. देवळात घंटा वाजवणार हिंदुत्व नकोय, अतिरेक्यांना बडवणारं हिदुत्व हवंय,असे देखील ठाकरे म्हणाले आहेत. तसेच जो देशाला आपले मानेल मग तो जन्माने कोणी असेल हे आमचे हिदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत. माझ्यावर टीका करता मी कॉँग्रेससोबत गेलो, का गेलो? कशाला गेलो? कुणी मला जायला लावलं? मी भाजपची साथ सोडली, हिंदुत्व सोडलं नाही आणि सोडूही शकत नाही, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : राहुल गांधी लोकसभेत कधी दिसणार, शिक्षेला स्थगिती पण खासदारकी कुठे अडकलीये?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT