Uddhav Thackeray : 'उद्धव गँरंटीला मोदीच साक्ष असतील', ठाकरे नेमकं काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ते 'जे म्हणातायत..मोदी गँरंटी, मोदी गँरंटी... त्यांच्यावर उद्धव गँरंटीचे लोकार्पण करण्याची वेळ आली आहे'. 'उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, त्यामुळे याला आता उद्धव गँरंटीच पंतप्रधान साक्ष असतील' असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
udhhav thackeray criticized pm narendra modi ashok chavan join bjp ahmednagar maharashtra politics
social share
google news

Uddhav Thackeray Criticized Pm Narendra Modi : ते 'जे म्हणातायत..मोदी गँरंटी, मोदी गँरंटी... त्यांच्यावर उद्धव गँरंटीचे लोकार्पण करण्याची वेळ आली आहे'. 'उद्धव ठाकरे (udhhav thackeray) जे बोलतो ते करून दाखवतो, त्यामुळे याला आता उद्धव गँरंटीच पंतप्रधान साक्ष असतील' असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (udhhav thackeray criticized pm narendra modi ashok chavan join bjp ahmednagar maharashtra politics)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचा शिवसेना संवाद मेळावा सुरू आहे. यानिमित्ते ते अहमदनगरच्या कोपरगावमधून बोलत होते. सगळ्या बाजूने आम्हाला घेरले. खासदाराला ही फोडलं. त्या खासदाराला माहिती नाही ज्यांनी निवडून दिलं ते निष्ठावंत माझ्यासोबत राहिलेले आहेत. तसेच इकडे टोप्या घालून सगळे बसले आहेत. 'मी उद्धव साहेबांसोबत'..., भाजपला हेच कळत नाही, इतके प्रयत्न करून सुद्धा त्यांना उद्धव ठाकरेंना संपवला आलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

आम्ही हिंदुत्व नाही सोडलं. आमचं हिदुत्व हे इतर धर्मीयांना कळालं आहे. आमचं हिंदुत्व हे आग  लावणारे हिंदुत्व नाही, तर देश रक्षण करणार हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच ते जे म्हणातायत मोदी गँरंटी. मोदी गँरंटी... त्यांना उद्धव गँरंटीचे लोकार्पण करण्याची वेळ आली आहे. आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, याला आता पंतप्रधान साक्ष असतील, असेही ठाकरे म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

मुंबईतील वरळी ते मरिन ड्राईव्ह पर्यंत असलेल्या कोस्टल रोडचं लोकार्पण करायला पंतप्रधान मोदी येणार आहेत. पण ते जे डंका पिटतायत मोदी गँरंटी. मोदी गँरंटी... त्यांना उद्धव गँरंटीचे लोकार्पण करण्याची वेळ आली आहे. आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, याला आता पंतप्रधान साक्ष असतील, असेही ठाकरे म्हणाले आहेत. 

खासदार सदाशिव लोखंडेवर टीका 

ADVERTISEMENT

इथला सुद्दा जो गद्दार (सदाशिव लोखंडे) आहे, त्याने गद्दारी केली. खरं तर गेल्या वेळीच ते निवडून येणार नव्हते. कारण तुमच्या मनात ते नव्हतेच. तरी शिवसेनेने संधी दिली आणि आपण काम करून त्यांना निवडून आणल होतं. पण आता ते स्व:ताच गेले आहेत. आता त्यांना भाजपने तिकीट देऊनच दाखवावे. मला तर वाटतं या गद्दाराला पुन्हा तिकीटच मिळणार नाही, असा दावा ठाकरेंनी केला आहे. 

ADVERTISEMENT

इकडे होतास ना, माझे सोन्यासारखे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. मनात नव्हतं तरी शिवसेनेने उमेदवार दिला म्हणून तुला निवडून देत होते. काही नव्हतास..कुठून उचलला...इकडे टाकला, फक्त शिवसेना हे लेबल लागले म्हणून, शिवसैनिकांनी आणि शिर्डीकरांनी अपार मेहनत करून शिवसेना या नावापुढे असलेल्या श्रद्धेपायी तुम्हाला एकदा नव्हे दोनदा निवडून दिले, असा हल्लाही ठाकरेंनी चढवला. 

वाकचौरेने शिवसेना चोरली नव्हती, लोखंडेने शिवसेना चोरली. शिवसेना आमची आहे. ही शिवसेना तुम्ही चोराच्या हातात देतायत. त्या चोरामध्ये एक हा गद्दार सामील होतोय. चुकीला माफी असते पण गुन्ह्याला माफी नसते. हे गुन्हेगार आहेत. पवित्र भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आहे.
यांना इकडे गाडलच पाहिजे, असा हल्ला देखील ठाकरेंनी लोखंडेंवर केला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT