विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून नाराज अपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या झटक्याने काँग्रेस सावध झालीये. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजी फटका विधान परिषद निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसनं नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आवश्यक मतांची संख्या नसतानाही भाजप आणि काँग्रेसनं जास्तीचा एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक रंगदार अवस्थेत पोहोचली आहे.

आघाडी की, भाजप… विधान परिषद निवडणुकीत कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार?, आकडे काय सांगतात?

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चौथी जागा जिंकण्याचा विश्वास होता, पण भाजपने बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीत सावध झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीची मदार अपक्षांवर आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून अपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसला दुसरी जागा जिंकण्यासाठी २७ च्या कोट्यानुसार बाहेरच्या १० मतांची गरज आहे. तर २६ च्या कोट्यानुसार ८ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

Radhakrishna Vikhe Patil: अजित पवार स्पष्टवक्ते-शब्दाचे पक्के; त्यांनी आमच्यासोबत यावं, भाजप नेत्याचं वक्तव्य

ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१४ जून) काँग्रेस नेते भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. अपक्षांमध्ये जास्त मतं असणाऱ्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केलं जात असल्याचं दिसत आहे.

छोटे पक्ष आणि अपक्ष पुन्हा निर्णायक ठरणार!

बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार, एमआयएमचे २, समाजवादी पक्षाचे २, प्रहारचे २, शेकापचा १, शेक्रांप १, मनसे १, जनसुराज्य १, रासप १ आणि माकप १ आमदार.

अपक्ष आमदारांमध्ये राजेंद्र येड्रावकर, चंद्रकांत पाटील, किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल, आशिष जैस्वाल, राजेंद्र राऊत, संजय शिंदे, नरेंद्र भोंडेकर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, प्रकाश आवाडे, रवि राणा, महेश बालदी यांचा समावेश आहे.

‘अजितदादांनी सांगितलं त्याला मतदान केलं’, राऊतांनी आरोप केलेला आमदार नेमकं काय म्हणाला?

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार राज्यातील राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे त्यांना जवळ करण्यात कुणाला यश मिळतं, यावर निकालाचं गणित अवलंबून असणार आहे.

शिवसेनेनं काय केला होता आरोप?

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही अपक्ष आमदारांची नावं घेत शिवसेना उमेदवाराला मतदान केलं नसल्याचा आरोप केला होता.

“वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाही. तसेच करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि त्यानंतर अजून एक शिंदे आहेत आमदार हा लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे. तसंच मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार. या आमदारांनी आम्हाला मतं दिली नाहीत,” असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT