Vidhan Parishad Election : आम्ही तीन जागा निवडून आणणार; राऊतांचे विधान
Vidhan Parishad Election Maharashtra : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी तीनही जागा जिंकेल असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधान परिषद निवडणूक २०२४
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक
संजय राऊत यांचा दावा
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून, महाविकास आघाडीने तीन उमेदवार उतरवल्याने निवडणुकीचे समीकरण बदलले आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांकडे तीन उमेदवार निवडून येतील, इतके संख्याबळ नाही. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा होतेय. अशात मविआचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले. (Sanjay Raut claims that Maha Vikas Aghadi will win three seats in assembly council election)
ADVERTISEMENT
दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "विधानसभेच्या तयारीला आम्ही सगळेच लागलेलो आहोत. आणि विधान परिषदेमध्ये काय निकाल लागतात, हे तुम्हाला लवकरच दिसेल. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक उमेदवार उभा केला आहे."
हेही वाचा >> शिंदेंचे उमेदवार ठरले! 'हे' दोन नेते आमदार होणार
"महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आहेत. आमचे मिलिंद नार्वेकर आहेत. आम्ही आमचे तीनही उमेदवार निवडून आणू", असा दावा संजय राऊत यांनी केला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> आमदार फुटणार? विधानसभेआधी पुन्हा राजकीय भूकंप?
महाराष्ट्रात फडणवीस हटाव...; राऊत काय बोलले?
"मी अनेकदा सांगतो की, महाराष्ट्राचा राजकारण कुणी बिघडवलं असेल, तर ते देवेंद्र फडणवीसांनी खराब केले आहे. या राज्याची संस्कृती, सभ्यता याला जर कुणी काळिमा फासला असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात भाजपची सूत्रे आल्यावर महाराष्ट्राचे नुकसान झाले. लोकसभेला मोदींविरोधात आमची लढाई होती. महाराष्ट्रात फडणवीस हटाव... जनता त्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करेल", असे विधान राऊत यांनी केले.
विधान परिषद निवडणूक : महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?
1) पंकजा मुंडे -भाजप
2) योगेश टिळेकर -भाजप
3) परिणय फुके -भाजप
4) सदाभाऊ खोत -भाजप
5) अमित गोरखे -भाजप
6) भावना गवळी - शिवसेना
7) कृपाल तुमाने - शिवसेना
8) शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस
9) राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस
10) प्रज्ञा सातव - काँग्रेस
11) मिलिंद नार्वेकर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
12) जयंत पाटील - शेतकरी कामगार पक्ष (मविआचा पाठिंबा)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT