राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं ठरली! चित्रा वाघ यांच्यासह 'हे' 7 जण होणार आमदार!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चित्रा वाघ यांच्यासह 'या' 7 आमदारांचा आज शपथविधी!

point

शिवसेना ठाकरे गट न्यायालयात जाणार?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असतानाच महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. (Vidhan Parishad MLC governor appointed 7 mla oath ceremony today 15 october 2024 in Central hall)

ADVERTISEMENT

आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्याआधी दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये 12 पैकी 7 आमदारांचा शपथविधी पार पडेल. विधीमंडाळत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: सोसाट्याचा वारा अन् मुसळधार! राज्यातील 'या' भागांना पाऊस झोडपणार

हे वाचलं का?

चित्रा वाघ यांच्यासह 'या' 7 आमदारांचा आज शपथविधी!

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तर, माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात येत आहे. आज हे सातही आमदार शपथ घेतील. 

ADVERTISEMENT

शिवसेना ठाकरे गट न्यायालयात जाणार?

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं जाहीर केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक होण्याची चर्चा आहे. कारण, राज्यपाल नियुक्त आमदार निवडले तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

7 ऑक्टोबरला सदर याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला, पण न्यायालयाचा निकाल येणे अजूनही बाकी आहे. अशातच या याचिकेचा निर्णय राखीव ठेवलेला असताना यावर निर्णय घेणे उचित नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी या नावांवर मान्यता दिली, तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT