‘…फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका’, मराठा आरक्षणावरून भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

ADVERTISEMENT

We are not against Maratha reservation but dont do us injustice Minister Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil
We are not against Maratha reservation but dont do us injustice Minister Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil
social share
google news

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) जोरदार राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन पुकारल्यापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यातच जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केल्यानंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालीही जोरदार ओबीसी महामेळाव्याचे (OBC) आयोजन केले जाऊ लागले. आजही त्यांनी ओबीसी एल्गार मोर्चात (OBC Elgar Morcha) बोलताना ओबीसी आरक्षणावरून जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.

हे ही वाचा >> Video : मोहम्मद शमी ठरला देवदूत! भयंकर कार अपघातात वाचवला लाख मोलाचा जीव

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीका आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आजच्या मेळाव्यातूनही त्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

आमचा विरोध नाही

यावेळी मंत्री छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून चाललेल्या राजकारणाला आणि जरांगे पाटील यांच्याकडून होणाऱ्या मागणीला त्यांनी थेट विरोध दर्शवत त्यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील यांनीही ठामपण भूमिका घेतली आहे, त्यामुळेच भुजबळांनीही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंगोलीतून बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही, फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका, एवढीच आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिंदे यांची समिती रद्द करा

यावेळी ते त्यांनी सांगितले की, सरकारने जी जी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती तयार केली आहे. ती आधी ताबडतोब रद्द केली पाहिजे, कारण कारण सर्वोच्च न्यायालयाकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले होते, की, मराठा समाज मागास नाही. त्यामुळे शिंदे समितीला आरक्षणाविषयी कोणताही अधिकार मिळत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या

छगन भुजबळ यांनी शिंदे समितीवर जोरदार टीका करत त्यांना अधिकारच नसल्याचे त्यांनी सांगितले. या समितीने आधी सांगितले की, 5 हजार कुणबी दाखले सापडले आहेत. तर दुसऱ्या दिवशी त्यांना साडेअकरा हजार कुणबी नोंदी सापडल्या. त्यानंतर लाखो सापडले आणि आता दोन-तीन कोटी कुणबी कागदपत्रे सापडल्याचेही समितीकडून सांगण्यात येते. त्यामुळे आता मागील दोन महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना तात्काळ स्थगिती देण्याची मागणीही भुजबळांनी केली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Jitendra Awhad : “अजित पवारांचे पक्षासाठी योगदान नाही, असे मी…”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT