समजून घ्या: दसरा मेळावा अन् शिवसेना… शिवाजी पार्कवरुन काय झालेला राडा?

अनुजा धाक्रस

ADVERTISEMENT

what happened in court last year on the dussehra melava dispute or how the thackeray group got permission from the high court last year at shivaji park
what happened in court last year on the dussehra melava dispute or how the thackeray group got permission from the high court last year at shivaji park
social share
google news

Dasara Melava Shiv Sena: मुंबई: दसरा मेळाव्यावरून पुन्हा शिंदे-ठाकरे लढाई सुरू झाली आहे. अगदी गेल्या वर्षीसारखंच चित्र आहे. दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दिले आहेत. महिनाभर आधी अर्ज देऊनही महापालिका काहीच निर्णय घेत नसल्याने नव्याने अर्ज देण्यात आला आहे आणि कोर्टात जाऊ असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे. गेल्या वर्षीही शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्याची परवानगी ही ठाकरे गटाला मुंबई उच्च न्यायालयाकडूनच मिळालेली, पण म्हणून यावर्षीही तसं होईल का? गेल्या वर्षी कोर्ट नेमकं काय म्हणालेलं हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. (what happened in court last year on the dussehra melava dispute or how the thackeray group got permission from the high court last year at shivaji park)

ADVERTISEMENT

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे गेल्या वर्षी दसरा मेळाव्यापर्यंत शिवसेना कुणाची याचा निर्णय नव्हता आला. शिवसेनेची प्रकरणं ही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग होती. गेल्या वर्षी 22 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट असं दोन वेळा ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई यांनी BMC कडे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. पण ह्यावर 20 दिवस उलटून गेले आणि दसरा पंधरवड्यावर आलेला असल्याने ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

हे ही वाचा>> देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांनाच घेरलं; म्हणाले, ‘ज्यांनी घालवलं, तेच…’

दुसरीकडे 30 ऑगस्टला शिंदे गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनीही BMC कडे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता.

हे वाचलं का?

हायकोर्टात काय झालं हे नंतर सांगूच, पण आधी BMC ने काय केलं हे जाणून घ्यायला हवं. 22-26 ऑगस्टला ठाकरे गटाचा आणि 30 ऑगस्टला शिंदे गटाचा अर्ज आल्यानंतर BMC ने मात्र प्रक्रिया केली ती थेट 21 सप्टेंबरला. 21 सप्टेंबरला मुंबई महापालिकेकडून मुंबई पोलिसांकडे विचारणा करण्यात आलेली, ज्यात पोलिसांनी दिलेल्या अहवालामध्ये सांगण्यात आलं की दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणत्याही गटाला परवानगी दिली तर कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू शकते.

पोलिसांच्या या अहवालानंतर मुंबई महापालिकेने निर्णय घेतला, तो असा..

• मुंबई पालिकेकडून शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी कुणालाही परवानगी नाही
• दोन्ही गटांमध्ये गणपती विसर्जनावेळी राडा झाला, त्यानंतर प्रभादेवीमध्ये राडा झाला
• मेळव्याला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते
• मुंबई पोलिसांच्या अभिप्रायामुळे शिवाजी पार्कवरील मेळाव्याची परवानगी नाकारली

ADVERTISEMENT

महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या बेंचसमोर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने BMC वरच ताशेरे ओढले. आधीच एक अर्ज असताना दुसरा अर्ज आला आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवेल या एकप्रकारे शुल्लक कारणासाठी परवानगी नाकारणं हा BMC ने आपल्या अधिकारांचा केलेला गैरवापर आहे. सोबतच 22 ऑगस्टला ठाकरेंचा आणि ३० ऑगस्ट शिंदेंचा अर्ज आल्यानंतर पोलिसांकडे अहवाल मागायला BMC ने २१ सप्टेंबरपर्यंत कसली वाट पाहिली असाही प्रश्न कोर्टाने केलेला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Wagh Nakh : संभाजीराजेंची उडी, ‘त्या’ वाघनखांबद्दल समोर आणला मोठा पुरावा

BMC ला तर हायकोर्टाने फटकारलंच सोबतच शिंदे गटाच्या वतीने सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिकाही कोर्टाने फेटाळली आणि ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. मेळावा आणि त्याच्या तयारीसाठी २ ते ६ ऑक्टोबर ठाकरे गट शिवाजी पार्क मैदान वापरू शकेल तसंच कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी आणि योग्य तितकी सुरक्षा पुरवण्याचे आदेशही कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT