मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?

राहुल गायकवाड

bjp obc jagar yatra in maharashtra marathi : भाजपने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काढण्यात आलेल्या या यात्रेचा राजकीय अर्थ काय?

ADVERTISEMENT

why BJP has taken out OBC Jagar Yatra in the Maharashtra?
why BJP has taken out OBC Jagar Yatra in the Maharashtra?
social share
google news

Bjp OBC politics explained in marathi : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने निजाम काळात कुणबी म्हणून नोंद असणाऱ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढला. पण, नंतर जरांगे पाटलांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. जरांगे पाटलांच्या या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. एकीकडे मराठा आरक्षणावरुन राजकारण सुरु असताना भाजपने ओबीसी जागर यात्रा का काढाली? तेच समजून घ्या… (Why OBC voter important to BJP)

भाजपकडून ओबीसी जागर यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही जागर यात्रा काढली जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसींची संख्या अधिक असणाऱ्या विदर्भावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या यात्रेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘विदर्भाच्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक योजना आणल्या आहेत. या यात्रेच्या माध्यमातून सरकारची चांगली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहचवणार आहोत.’

मराठा विरुद्ध ओबीसी

गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण केलं. तर धनगर आरक्षणासाठी देखील राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला. ओबीसी समाजाकडून आंदोलनं करण्यात आली, त्याचबरोबर चंद्रपूरात उपोषण देखील करण्यात आलं.

भाजपचं लक्ष्य ओबीसी मतदारांवर का?

ओबीसी हा भाजपचा पारंपरिक मतदार राहिला आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी ‘माधवं’ सुत्रं स्वीकारत भाजपचा विस्तार केला. यात माळी, धनगर, वंजारी या समाजाला भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. २०१४ आणि २०१९ साली भाजपला ओबीसी समाजाचं मोठं मतदान झालं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp