Maharashtra Political Crisis: ..तर यांची आमदारकी जाणार, CM शिंदेसह ‘ते’ 16 आमदार कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

who are those 16 mla including cm eknath shinde supreme court will pronounce verdict on disqualification on may 11
who are those 16 mla including cm eknath shinde supreme court will pronounce verdict on disqualification on may 11
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषाची (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ अशी सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला. साधारण 9 महिने या संपूर्ण सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूने कायद्याचा अक्षरश: किस पाडण्यात आला. साधारण मार्च महिन्यात ही संपूर्ण सुनावणी पार पडली. ज्यानंतर कोर्टाने याबाबत निर्णय राखून ठेवला होता. अखेर उद्या (11 मे) कोर्ट याप्रकरणी निर्णय देणार आहे. अशावेळी आता CM शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांची बरीच धाकधूक वाढली आहे. (who are those 16 mla including cm eknath shinde supreme court will pronounce verdict on disqualification on may 11)

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी साधारण 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. मात्र, ठाकरे गटाकडून 16 आमदारांना अपात्रेतीच नोटीस बजावण्यात आली आहे. याच 16 आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी प्रमुख मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ज्यावर आता कोर्ट आपला निकाल देणार आहे.

कोण आहेत ‘ते’ 16 आमदार ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार!

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी-पांचपाखाडीचे आमदार,
  2. आमदार तानाजी सावंत – भूम परंडा
  3. आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड
  4. आमदार यामिनी जाधव – भायखळा
  5. आमदार संदीपान भुमरे – पैठण
  6. आमदार भरत गोगावले – महाड
  7. आमदार संजय शिरसाठ – छत्रपती संभाजीनगर पश्चिम
  8. आमदार लता सोनावणे – चोपडा
  9. आमदार प्रकाश सुर्वे- मागाठाणे
  10. आमदार बालाजी किणीकर – अंबरनाथ
  11. आमदार बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
  12. आमदार अनिल बाबर – खानापूर
  13. आमदार संजय रायमूलकर – मेहेकर
  14. आमदार रमेश बोरनारे – वैजापूर
  15. आमदार चिमणराव पाटील – एरोंडोल
  16. आमदार महेश शिंदे – कोरेगाव]

हे ही वाचा >> हद्दच झाली! आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाचा ट्रॅक्टर गेला चोरीला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : या प्रश्नांची मिळणार उत्तरं…

-एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेत मोठ बंड झालं. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रकरणावर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निकाल देणार आहे.

हे वाचलं का?

-विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबद्दल अपेक्षित महत्त्वाचा निकाल आणि सभापतींना हटवण्याची मागणी करणारी पूर्वसूचना सभागृहासमोर प्रलंबित असल्यास आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर पुढे जावे की नाही, यासंदर्भात हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे.

-पक्षांतर, विलीनीकरण आणि दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेशी संबंधित अनेक महत्त्वाचे घटनात्मक प्रश्नांची उत्तरं या प्रकरणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून मिळणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> “आ गए गद्दार”, शरद पवार शिंदेंवर बरसले, मोदींवरही चढवला हल्ला!

-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या निर्णयाच्या वैधतेबद्दलही निकालात स्पष्टता असू शकते.

ADVERTISEMENT

-एकट्या विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या एका गटाचा पाठिंबा असलेल्या गटाला पक्ष म्हणता येईल का, याचं उत्तरही सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT