Praveen Sood : कर्नाटकाचे डीजीपी आता सीबीआयचे नवीन प्रमुख, कोण आहेत सूद?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Who is IPS Praveen Sood New Cbi Director
Who is IPS Praveen Sood New Cbi Director
social share
google news

Who is IPS Praveen Sood New Cbi Director : केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद (Praveen Sood) यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI)संचालकपदी नियुक्ती केली आहे. सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ 25 मेला संपणार आहे. त्यांच्या जागी आता प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI)संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेमके हे प्रवीण सूद कोण आहेत? हे जाणून घेऊयात.(who is ips officer praveen sood appointed as cbi director)

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस डी. वाय. चंद्रचुड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजर चौधरी यांच्यामध्ये शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे अधीर रंजन चौधरी यांनी बैठकीत प्रवीण सूद यांच्या उमेदवारांवर आक्षेप घेतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा : डीके शिवकुमार यांचे भाकीत ठरलं खरं! 128 दिवसांपूर्वी म्हणाले होते…

कोण आहेत प्रवीण सूद?

  • प्रवीण सूद यांचा जन्म 1964 मध्ये झाला आहे.
  • प्रवीण सूद IIT दिल्लीचे पदवीधर आहेत.
  • 1986 मध्ये भारतीय पोलीस सेवेत (IPS) रुजू झाले.
  • 1989 मध्ये म्हैसूरमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
  • नंतर पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून बंगळुरू येथे नियुक्तीपूर्वी बेल्लारी आणि रायचूर मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले.
  • प्रवीण सूद 1999 मध्ये 3 वर्षे मॉरिशसमध्ये प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे.
  • न्यूयॉर्कला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर आणि मॅक्सवेल स्कूल ऑफ गव्हर्नन्स, सायराक्यूज युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमधून सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन विषयात शिकण्यासाठी गेले होते.
  • प्रवीण सूद यांनी 2004 ते 2007 या काळात म्हैसूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानी वंशाच्या लोकांसह दहशतवाद्यांच्या नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर काम केले.
  • 2011 पर्यंत त्यांनी बंगळुरूच्या वाहतूक पोलिसात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले.
  • प्रवीण सूद यांना 1996 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदक, 2002 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक आणि 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले होते.
  • 2013-14 मध्ये, प्रवीण सूद यांनी कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्विकारला.
  • प्रवीण सूद यांनी राज्याच्या गृह विभागामध्ये प्रधान सचिव, कर्नाटक राज्य राखीव पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
  • महिलांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आणल्याबद्दल प्रवीण सूद यांचे कौतुक होत आहे.
  • प्रवीण सूद सध्या कर्नाटक पोलिसांचे DGP म्हणून कार्यरत आहेत.

हे ही वाचा : कर्नाटकचा निकाल लागताच केंद्राचा मोठा निर्णय, प्रवीण सूद CBIचे नवीन संचालक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT