Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘बाजीगर’ कोण? जाणून घ्या कोणाकडे किती आमदार

मुंबई तक

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच येणार असून सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल कसं आहे आणि ते यापुढे कसं राहील हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

who is the chanakya of maharashtra politics know who has how many mlas Uddhav Thackeray vs Eknath Shinde
who is the chanakya of maharashtra politics know who has how many mlas Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आज (11 मे) ‘सर्वोच्च’ निर्णय होणार आहे. उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ गुरुवारी निकाल देणार आहे. गतवर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते. मात्र, ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार असून, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार हे निश्चित आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला शिवसेनेच्या 15 आमदारांसह उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले होते. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 16 आमदार आधी सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीत राहिले. त्यावेळी उद्धव यांनी शिंदे यांना परत येऊन बसून चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र शिंदे यांनी तो मान्य केला नाही आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे-भाजप युतीचे सरकार ओळखून राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 15 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर ते घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 17 फेब्रुवारी रोजी दोन्ही गटांच्या याचिकांवर सुनावणी केली. 21 फेब्रुवारीपासून कोर्टाने या प्रकरणाची सलग 9 दिवस सुनावणी केली होती. 16 मार्च रोजी सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आणि आता गुरुवारी या प्रकरणावर निकाल देणार आहे.