Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?, ती पोस्ट अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?
Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयदीप आपटेने तयार केलेल्या शिवाजी महाराजांची मूर्तीवरून नवा वाद

point

शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये दाखवलेला 'तो' घाव

point

जयदीप आपटेच्या त्या मूर्तीवरून नवा वाद

Shivaji Maharaj idol and Jaydeep Apte: मुंबई: भारतीय नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंचीचा पुतळा सोमवारी कोसळला. अवघ्या ८ महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेला पुतळा कोसळल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवरायांचा हाच पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे हा आता आणखी एका कारणामुळं वादात सापडलाय. (why that wound shown by jaydeep apte in statue of shivaji maharaj new controversy from that facebook post)

ADVERTISEMENT

जयदीप आपटेने फेसबुकवर शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला होता. जो त्याने तयार केलेल्या महाराजांच्या एका मूर्तीचा होता. पण आता यावरूनच एक नवा वाद आता सुरु झाला आहे.

हे ही वाचा>> Sindhudurga: 'अरे ठेचून एक-एकाला रात्रभर मारुन टाकेन...', पोलिसांसमोर नारायण राणेंची थेट धमकीची भाषा

फेसबुकवर 5 मे 2023 ला जयदीपनं एक पोस्ट शेअर केली होती. In Progress... असं कॅप्शन देत महाराजांच्या एका मूर्तीचा फोटो त्यानं शेअर केला होता. 

हे वाचलं का?

या शिल्पामध्ये महाराजांच्या कपाळावर एक खूण सुद्धा दिसत आहे. ज्यावरुन आता जयदीपवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली जात आहे. महाराजांचा पुतळा बनवताना जयदीपने जाणूनबुजून महाराजांच्या कपाळावर डाव्या बाजून वार झाल्याची एक खूण बनवली होती. ज्यावरून आता बरीच टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

अमोल मिटकरींचं ट्विट 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जयदीपची ती पोस्ट शेअर करत, जबाब तो देना पडेगा असं म्हटलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली? काय या मागचा इतिहास? सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जबाब तो देना पडेगा.' असं म्हणत मिटकरींनी आपटेला जाब विचारला आहे.

ADVERTISEMENT

शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये जयदीप आपटेने जाणीवपूर्वक दाखवलेला 'तो' घाव

ही खूण नेमकी कसली आणि कधीची आहे यावर जयदीप आपटेनं एका फेसबूक युजरला दिलेला रिप्लाय सुद्धा व्हायरल होतो आहे.

ADVERTISEMENT

'मस्त डिटेलिंग केलंय, महाराजांच्या डोक्यावर घावाची खूण सुद्धा शिल्पात दिसतीये.' अशी एकाने यूजरने जयदीपच्या फोटोवर कमेंट केली होती.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: "नारायण राणे कुणाला धमक्या..."; राजकोटच्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

ज्यावर जयदीपने रिप्लाय देताना म्हटलं होतं की, 'तू पहिलाच आहे ज्याने हे ओळखलं. बाकिच्यांना समजावून सांगावं लागतं.' अशी प्रतिक्रिया जयदीपने दिली. 

'पुढे आणखी एका युजरला रिप्लाय देताना जयदीप म्हणतो, 'मला काही वर्षांपूर्वीच हे सुचलं किंवा काम करताना एकदम आठवलं की शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं काम करताना 1659 च्या आधीचा किंवा त्यानंतरचा काळ दाखवता येऊ शकतो. 1659 मध्ये अफजलखान स्वारीच्या वेळी शिवरायांना डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीने जखम झाली होती. हाच संदर्भ इथे वापरला.' असा रिप्लाय जयदीपने दिला होता.

 

 

दरम्यान, या सगळ्या प्रतिक्रिया साधारण वर्षभरापूर्वीच्या आहेत. मात्र, जेव्हा मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर जयदीप आपटे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या रडारवर आल.  

शिवरायांच्या जखमेचा घाव अभिमानाने शिवरायांच्या पुतळ्यावर का दाखवला? असा सवाल विचारत जयदीप आपटेवर आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

28 मे 2023 रोजी महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर जयदीपनं पुन्हा एकदा फोटो शेअर केला होता. त्यावर देखील आता अनेक कमेंट येत आहे. 

'प्रतापगडाच्या रणसंग्रामात कृष्णा भास्कर कुलकर्णीने वार केलेला आठवतो पण दुसऱ्या क्षणात छत्रपतींनी मुंडकं छाटून टाकले हे विसरलास मित्रा. छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान अक्षम्य आहे. लायकी नसली तर काम का करायचं फक्त एक वार अजरामर करण्यासाठी लाखो शिवभक्तांच्या भावनेसोबत खेळलास जाहीर निषेध तुझ्या प्रवृतीचा.' असं म्हणत जयदीपवर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आता जयदीप आपटे हा फरार झाला आहे. त्याच्या कल्याण येथील घराला कुलूप असल्याची माहिती आता समोर आली आहे. आता जयदीप आपटेला अटक होते का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT